$type=ticker$snippet=hide$cate=0

डिसलेंच्या कामावर जागतिक मोहर

  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या गुणवत्तेबद्दल आणि तेथील शिक्षकांच्या कामाबाबत कायम टीका होत असते. येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ...


  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या गुणवत्तेबद्दल आणि तेथील शिक्षकांच्या कामाबाबत कायम टीका होत असते. येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कुवतीबद्दलही साशंकता घेतली जात असते; परंतु अलिकडच्या काळात जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट चांगलाच वाढत आहे आणि जिल्हा परिषदांच्या काही शाळांचा गुणवत्तेशी तर कोणीही स्पर्दा करू शकणार नाही, अशी स्थिती आहे. शिक्षण क्षेत्रातील ही ओअ‍ॅसिस जेव्हा वाढतील, तेव्हा शिक्षणाच्या गुणवत्तेचं सार्वत्रिकीकरण होईल. त्यासाठी अनेक रणजितसिंह डिसले तयार व्हावे लागतील.

भारतात शहरी आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधांमध्ये मोठी तफावत आहे. आर्थिक स्थिती ही शिक्षणाच्या गुणवत्तेचा एक निकष आहे. जिल्हा परिषदांच्या शाळा या चेष्टेचा विषय ठरल्या असताना  असताना जिल्हा परिषदेच्याच शाळेतील एक शिक्षक आपल्या उपक्रमामुळं जागतिक पातळीवर पोचतो, एवढंच नव्हे, तर जागतिक पातळीवरचा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय शिक्षक ठरतो, हा समस्त भारतीय शिक्षकांचा सन्मान आहे. तो भारताचाही सन्मान आहे. त्याचं कारण आता शिक्षण हा ही मोठा उद्योग झाला असून त्यातून परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. नेमकं अशा काळात भारतीय शिक्षकाला जागतिक पुरस्कार मिळत असेल, तर तो जगाला एक चांगला संदेश देतो.

ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्यार्‍या रणजितसिंह डिसले यांना यंदाचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. युनेस्को आणि लंडनमधल्या वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार देण्यात येतो. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील परितेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत डिसले प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात. या पुरस्कारासाठी जगभरातून तब्बल 12 हजार नामांकनं दाखल झाली होती. त्यापैकी दहा शिक्षकांना अंतिम यादीत स्थान मिळालं. त्यात डिसले यांचंही नाव होतं. या पुरस्काराची रक्कम दहा लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजे सात कोटी रुपयांहून अधिक आहे. डिसले यांनी यातली निम्मी रक्कम इतर नामांकनप्राप्त अन्य दहाशिक्षाकांमध्ये वाटप करण्याचं ठरवलं आहे. त्यांच्या मनाचा मोठेपणा त्यातून दिसतो. डिसले यांच्यासोबतच इटली, ब्राझील, व्हिएतनाम, मलेशिया, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि ब्रिटनमधील शिक्षक हे या यादीतल्या टॉप टेनमध्ये होते. डिसले यांच्या निर्णयामुळं या शिक्षकांना प्रत्येकी जवळपास 40 लाख रुपये मिळणार आहेत. ओंजळ भरलेली असून चालत नाही, तर भरलेल्या ओंजळीतून काही इतरांच्या ओंजळीत टाकण्याचं दातृत्व असावं लागतं. डिसले यांनी ते दाखवून दिलं. अंतिम यादीतल्या सगळ्या शिक्षकांकडं एकसारखीच गुणवत्ता आहे. मी फक्त एक निमित्त आहे. दुसरं म्हणजे दहा शिक्षक जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम वापरतील तेव्हा मोठा बदल घडेल, असं डिसले सांगतात. त्यातून त्यांच्या मनात शिक्षणाविषयीची तळमळ तर दिसतेच; शिवाय नामांकन झालेले शिक्षक आपले स्पर्धगक नाहीत, तर एकाच होडीतील आपण सर्वंच नाविक आहोत, हे त्यांनी दाखवून दिलं.

सध्या आपण खूप कठीण काळातून जात आहोत. या काळात चांगलं शिक्षण मिळणं हा मुलांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मागासवर्गातल्या मुलींच्या शिक्षणासाठी डिसले यांनी विशेष प्रयत्न केले.. त्यामुळं या मुलींची शाळेतील गळती थांबली. तसंच बालविवाहालाही आळा बसला, असं वार्की फाउंडेशननं पुरस्कार देताना म्हटलं आहे. डिसले यांनी शिक्षणामध्ये इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केला आहे. पुस्तकांमध्ये क्यूआर कोडच्या माध्यमातून मुलांना सोप्या भाषेत कसं शिकता येईल यावर ते अधिक भर देतात. तब्बल 83 देशांतल्या मुलांसाठी ते विज्ञानाचे ऑनलाईन क्लासेस घेत आहेत. अशांत देशातील मुलांसाठी लेटस् क्रॉस द बार्डर या नावाचा कार्यक्रमही ते राबवत आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील पालकांची तुलना करायची झाली, तर ग्रामीण भागातील पालकांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाविषयी अधिक काळजी करायला पाहिजे. शिक्षणातली गुंतवणूक ही केवळ मुलांचं भविष्य उजळवत नाही, तर त्यामुळं घराची आर्थिक परिस्थितीही उंचावते, असं डिसले सांगतात. शासकीय यंत्रणा, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या बिगर सरकारी संस्थांमध्ये समन्वय वाढला, तर सरकारी शाळा अधिक सुधरतील. सध्या प्रत्येकजण अलिप्तपणे काम करताना दिसत आहे. मोठा बदल घडवण्यासाठी टीम वर्क गरजेचं आहे. शिक्षकांना पुरेसा आदर मिळायला पाहिजे, हे त्यांचं म्हणणं चुकीचं नाही. डिसले हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातली बार्शी तालुक्यातील आहेत. त्यांचं शालेय शिक्षण बार्शीमधल्याच सुलाखे विद्यालयामध्ये झालं. ते 2009 पासून प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत. गेल्या 11 वर्षांपासून ते या क्षेत्रात आहेत. हा पुरस्कार त्यांना एका कामासाठी मिळालेला नाही. यात अनेक वर्षांची मेहनत आहे. ग्रामीण भागातल्या मुलींचं शिक्षण, अशांत देशातल्या मुलांसाठीचं काम, तसंच मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी, यासाठी केलेले प्रयत्न यात सामील आहेत. याआधी डिसले यांना मायक्रोसॉफ्ट फाउंडेशनचा शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार मिळाला होता. क्यू आर कोडचा वापर करून मुलांना पुस्तकातील कविता, धडे, अधिक माहिती मिळवता येते, या त्यांच्या कल्पकतेला तो पुरस्कार मिळाला होता. ग्लोबल टीचर पुरस्कारातून मिळालेली रक्कम ही शिक्षण क्षेत्रातल्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी वापरली जाईल, असं डिसले यांनी सांगितलं.

सरकारी शाळा अधिक कार्यक्षम करण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि शिक्षण व्यवस्था यांच्यात समन्वय पाहिजे असं त्यांना वाटतं. तसं झालं तर सरकारी शाळेतील शिक्षणाचा दर्जा आणखी वाढेल. सरकारनं शिक्षण क्षेत्रातल्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी आर्थिक गुंतवणूक करणं फार गरजेचं आहे, असंही ते आवर्जून सांगत होते. जगानं मोठं म्हटल्यानंतर आपणही मोठं म्हणण्याची भारतीयांची मानसिकता हे आपलं अपयश आहे. शिक्षकांचं महत्त्व, त्यांचं काम, त्यांचा सामाजिक दर्जा यांचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. शिक्षकांची गुणग्राहकता आणि योगदानाला मान्यता मिळायला हवी, अशी अपेक्षा डिसले यांनी जी अपेक्षा व्यक्त केली, ती अतिशय रास्त आहे. भारतीय शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढायला हवा, असा त्यांचा आग्रह आहे. परदेशातील शिक्षण पद्धती जाणून घेताना भारतीय शिक्षण पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास करता भारतात प्रचंड लोकसंख्या हा प्रमुख अडसर आहे. परदेशात 18 ते 20 विद्यार्थ्यांमागं एक शिक्षक असं प्रमाण असतं, तर भारतात हेच प्रमाण 50 ते 60 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता आपल्याकडं परदेशाप्रमाणं शिक्षक नियुक्त करणं कठीण आहे; परंतु अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढविला, तर शिक्षणाची उद्दिष्टं आपण सहज पूर्ण करू शकतो; मात्र हे करीत असतानाही शिक्षण क्षेत्र राजकारणापासून अलिप्त ठेवण्याची गरज आहे. मंत्री, पुढार्‍यांना शिक्षण पद्धतीत बदल करण्याचे अधिकार वा त्यात हस्तक्षेप असता कामा नये. शिक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य  असायला हवं. केवळ पाठयक्रम पूर्ण करण्यापुरतंच शिक्षकांचं काम नसावं, तर उद्दिष्टं पूर्ण करताना शिक्षकांना जे प्रयोग किंवा उपक्रम राबवायचे आहेत, त्यासाठी त्यांना स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन मिळालं पाहिजे, हे जे मत डिसले यांनी व्यक्त केलं, ते राज्यकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारं आहे. डिसले यांनी आपले हे कार्य जागतिक स्तरावर नेण्यासाठी यशस्वी पावलं उचलली. त्यांच्या या कामावर आता ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कारानं जागतिक मोहर उमटवली आहे. 


Name

] ब्रेकिंग,861,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5776,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,208,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,153,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10355,औरंगाबाद,366,क्रीडा,678,दखल,708,देश,4453,नाशिक,805,पुणे,749,बीड,1438,बुलडाणा,27,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16501,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13744,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3727,विदेश,652,संपादकी,1,संपादकीय,1556,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: डिसलेंच्या कामावर जागतिक मोहर
डिसलेंच्या कामावर जागतिक मोहर
https://lh3.googleusercontent.com/-JVlgmI34oX4/X8tja_id-XI/AAAAAAABl_M/v9Y5rjU752QBpXXV2milpMUgSLTTLGh7QCLcBGAsYHQ/image.png
https://lh3.googleusercontent.com/-JVlgmI34oX4/X8tja_id-XI/AAAAAAABl_M/v9Y5rjU752QBpXXV2milpMUgSLTTLGh7QCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_480.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_480.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content