कुमार कडलग/ नाशिक : अवैध धंद्यांबाबत पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या भुमिके विरोधात मध्य नाशिकच्या आ.देवयानी फरांदे यांनी गृहमंञ्यांकडे तक्रारव...
कुमार कडलग/ नाशिक : अवैध धंद्यांबाबत पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या भुमिके विरोधात मध्य नाशिकच्या आ.देवयानी फरांदे यांनी गृहमंञ्यांकडे तक्रारवजा कैफियत सादर केली आहे. दोन महिन्यात चकार शब्दही न काढणाऱ्या भाजपच्या लोक प्रतिनिधींनी हीच वेळ का निवडली असा नाशिककरांचा सवाल आहे.
नाशिक पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यापासून दोन तीन पोलीस आयुक्तांचा अपवाद वगळता बाकीच्या पोलीस आयुक्तांनी केवळ आयुक्तपदाची शोभा केली.कुणी जादूच्या कांडीचा विनोद केला तर कुणी समाज माध्यमांमधून प्रतिमा बांधण्याचा प्रयत्न केला. राॕय,मिश्रा,जगन्नाथन, सिंगल यांच्या कार्यकाळात पोलीसींगचे खऱ्या अर्थाने अस्तित्व जाणवले.याच परंपरेत कार्यपध्दतीत आमुलाग्र बदल करून विद्यमान पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय नाशिककरांच्या चर्चेचा विषय बनले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची पोलीस मॕन्युअलची भाषा चर्चेत आली.
अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पोलीसांचा केवळ वापर होत असून या व्यवसायातून निर्माण होणारा महसूल गोळा करणारे विभाग आपली जबाबदारी विसरल्याची जाणिव त्यांनी प्रथमच करून दिली.पोलीस आयुक्तांची ही भुमिका जिल्हाधिकाऱ्यांनाही पटली म्हणूनच तर अवैध धंद्यांना अटकाव करण्यासाठी जिल्हास्तरीय नियंञण कक्षाची स्थापना केली.अर्थात या कक्षाची स्थापना झाल्यापासून किती अवैध धंद्यावर नियंञण मिळवण्यात यश आले हा संशोधनाचा विषय असला तरी पोलीस आयुक्तांची भुमिका प्रशासनाने मान्य केली हे वास्तव नाकारता येणार नाही. पोलीस आयुक्तांच्या या भुमिकेचे गृहमंञ्यांनीही स्वागत केले आहे. आ.देवयानी फरांदे यांना माञ पोलीस आयुक्तांची भूमिका पटलेली दिसत नाही.गृहमंञी अनिल देशमुख यांची भेट घेऊन आ.फरांदे यांनी थेट अवैध धंद्यांबाबत शासनाची भुमिका स्पष्ट करण्याची मागणी केल्याचे वृत्त आहे.माञ ही मागणी सहेतूक की निर्हेतूक,नाशिककरांविषयीची तळमळ की पोलीसांविषयीची असूया यावर नाशिककरांना शंका आहे.दोन महिन्यानंतर आ. फरांदे यांनी या भुमिकेवर आक्षेप का नोंदवला? गेली पाच वर्ष सत्तेत असताना एकदाही शहरातील अवैध धंद्यांबाबत भुमिका न घेणारे लोक प्रतिनिधी आत्ताच का जागे झाले?निवेदनात उल्लेख असलेल्या अवैध धंद्यांना असलेल्या राजाश्रयाबाबतही सत्ताधारी किंवा विरोधक आपली भुमिका स्पष्ट करू इच्छित नाहीत.विद्यमान पोलीस आयुक्तांनी निदान अवैध धंद्याबाबत भुमिका घेण्याचे धाडस तरी दाखवले. पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरून नाशिककरांच्या अडचणीही समजून घेत आहेत.सध्या शहराला भेडसावणारा पार्कींगचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कंबर कसली असून तज्ञ मंडळींसोबत ते स्वतः शहरातून पायपीट करतांना दिसतात.नाशिककरांच्या मनाचा ठाव घेऊन वेदना संवेदना जाणून घेणारे पोलीस आयुक्त शहरावासियांना हावे असतांना राजकीय मानसिकतेला अडचणीचे का वाटतात असा गुढ सवाल गृहमंञ्यांच्या भेटीतून उपस्थित झाला आहे.
" पोलीस विभाग कायदा सुव्यवस्था अबाधित राखून जनतेची सेवा करण्यासाठी आहे.त्यासाठी शासन पगार देते.शासनाचे आदेशावर आम्ही काम करतो.अवैध धंद्यांवर पोलीसांनीच कारवाई करावी असा आदेश शासनाने दिला तर त्यासाठी आम्ही बांधील राहू.माञ घटनात्मक जबाबदारी आहे त्यांनी जबाबदारी झटकता कामा नये.आम्ही आमची जबाबदारी नाकारत नाही.जिथे आवश्यक आहे तिथे अन्य शासकीय विभागांना पोलीसांचे सहकार्य आहे आणि राहील.नाशिक शहराला पार्कींगचा प्रश्न भेडसावत आहे.त्यासंदर्भात उपाय योजना सुरू केल्या असून लवकरच परिणाम दिसेल.
- दीपक पाण्डेय पोलीस आयुक्त नाशिक