नगर/ता.प्रतिनिधी ः नगर जामखेड महामार्गावरील सारोळा बद्वी येथे केडगाव वाहतूक मदत केंद्र पोलिसांतर्फे, सिट बेल्ट, मास्क, विना हेल्मेट दुचाकीच...
नगर/ता.प्रतिनिधी ः नगर जामखेड महामार्गावरील सारोळा बद्वी येथे केडगाव वाहतूक मदत केंद्र पोलिसांतर्फे, सिट बेल्ट, मास्क, विना हेल्मेट दुचाकीचालकांनवर कार्यवाही करण्यात येत आहे. या कारवाईमुळे नगर जामखेड महामार्गावरील बेशिस्त वाहनचालकांना लगाम बसला असून सर्व स्तरातून पोलिसांचे कौतुक केले जात आहे. गाडी चालवताना मोबाईलचा वापर टाळा तसेच गाडी चालवताना सीट बेल्ट लावण्याचे फायदे यावेळी पोलिस वाहनचालकांना समजून सांगत आहेत.
दुचाकीवर ट्रिपल सीट चालणार्या दुचाकीवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. सुमारे एक ते दोन महिन्यापासून ही कारवाई सुरू असल्याने नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळण्यात सुरुवात केली आहे. त्याचबरोबर दारू पिऊन वाहन चालवणार्या वाहनचालकांना मोठा लगाम बसला असल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. पोलीसांनी सुरु केलेल्या कार्यवाहीने नागरिकांनी कौतुक केले असुन यह पुढेही अशीच कार्यवाही सुरु ठेवण्याची मागणी होत आहे.ही कार्यवाही वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल औटी यांच्या मार्गदर्शनाखाली एस सी गाढवे, ए सी खैरे, पोलीस हवालदार व्हि के भिवर, पोना बडे.आदि हि कार्यवाही करत आहेत.