मुंबई/प्रतिनिधी : मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी ब्रिटनमधून मुंबईत आलेले 12 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती द...
मुंबई/प्रतिनिधी :
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी ब्रिटनमधून मुंबईत आलेले 12 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर आणि 23 डिसेंबरपासून आतापर्यत जे प्रवासी युके, आखाती देशातून आले आहेत, त्या सगळ्यांना आम्ही क्वॉरन्टीन केलं होतं, त्यासोबतच त्यांच्या टेस्टिंगच्या प्रक्रिया सुद्धा सुरु आहे. या टेस्टिंगमध्ये 25 ते 21 डिसेंबर दरम्यान आलेले 2600 पेक्षा जास्त प्रवासी आहे. 21 डिसेंबर ते आतापर्यत आलेले सर्व प्रवाशांचे टेस्टिंग केले आहेत.
या दरम्यान 12 प्रवासी पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे. यामध्ये पाच कोरोनाबाधित मुंबईतील आहेत. तर उर्वरित सात जण इतरत्र भागातील आहेत. या सर्वांचे नमुने एनआयव्ही पुणे इथे पाठवले असून त्यांचा अहवाल येत्या एक दोन दिवसात येईल. त्यानंतर पॉझिटिव्ह आढळलेले 12 जणांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आहे की नाही.
दरम्यान या 12 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी तीन जण आज निगेटिव्ह झाले आहेत. काळजी करण्याचं कारण नसलं तरी खबरदारी घ्यावी लागणार आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचाही शोध घेतला जात असून त्यांचीही चाचणी सुरु आहे. नव्या कोरोना विषाणूबाबत संभाव्य खबरदारी आपण घेत आहोत. त्यामुळे सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे