अहमदनगर / प्रतिनिधीः शनी शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर झाली आहे. अहमदनगर धर्मदाय आयुक्तांनी 11 सदस्यीय विश्वस्त मंडळांची कार्यक...
अहमदनगर / प्रतिनिधीः शनी शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर झाली आहे. अहमदनगर धर्मदाय आयुक्तांनी 11 सदस्यीय विश्वस्त मंडळांची कार्यकारिणी जाहीर केली. मंडळाच्या कार्यकारिणीसाठी 84 ग्रामस्थांनी मुलाखती दिल्या होत्या. मुलाखती नंतर 11 सदस्यीय विश्वस्त मंडळ जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे निवड करण्यात आलेले सर्व सदस्य हे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे समर्थक आहेत.
हे विश्वस्त मंडळ एक जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2026 या पाच वर्षांसाठी कार्यरत असणार आहे.
दरम्यान, नवीन विश्वस्त मंडळ जाहीर झाल्यानंतर गडाख यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. देवस्थान नावारूपाला आणण्यासाठी या गावातील प्रत्येक कुटुंबाचा त्याग आहे. परंपरा जपण्यासाठी गावकरी बिगर दरवाजाच्या घरात राहत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदू धर्माची परंपरा राखण्याचे काम केले, असे ते म्हणाले. पानासनाला प्रकल्पाचा लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. येथील विकासासाठी विविध उद्योगपतींशी चर्चा करून सामाजिक दायित्व निधीतून येथे काम करण्यात येणार आहे, अशी माहिती गडाख यांनी या वेळी दिली.
विश्वस्त असे
बाळासाहेब बन्सी बोरुडे, विकास नानासाहेब बानकर, छबुराव नामदेव भूतकर, पोपट लक्ष्मण कुर्हाट, शहाराम रावसाहेब दरंदले, भागवत सोपानराव बानकर, सुनीता विठ्ठल आढाव, दीपक दादासाहेब दरंदले, शिवाजी अण्णासाहेब दरंदले, पोपट रामचंद्र शेटे, आप्पासाहेब ज्ञानदेव शेटे