$type=ticker$snippet=hide$cate=0

हमी भाव मका खरेदी केंद्र बंद

अहमदनगर / प्रतिनिधी : शेतमालाच्या हमी भावाला संरक्षण मिळण्याची प्रमुख मागणी घेऊन दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांना राज्यातील महाविकास...



अहमदनगर / प्रतिनिधी : शेतमालाच्या हमी भावाला संरक्षण मिळण्याची प्रमुख मागणी घेऊन दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांना राज्यातील महाविकास आघाडीतील पक्षांचाही पाठिंबा आहे; मात्र दुसरीकडे राज्य सरकारने सुरू केलेली हमी भाव मका खरेदी केंद्र मात्र बंद करण्यात आली आहेत. यावरून कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बंद केंद्राच्या समोरच शेतकर्‍यांनी मका भरलेली वाहने आणून उभी केली असून खरेदी सुरू झाल्याशिवाय हटणार नसल्याचा इशारा दिला आहे. 

शेतकर्‍यांनी पिकविलेला मका हमी भावाने खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून खरेदी केंद्र सुरू केली जातात. या वर्षी कर्जत तालुक्यात ही केंद्र सुरू करण्यास उशीर झाला. त्यासाठी भाजपतर्फे आंदोलने करण्यात आली. अखेर ही केंद्र सुरू करण्यात आली. मका खरेदी सुरू असताना संपूर्ण खरेदी होण्यापूर्वीच ती बंदही करण्यात आली. राज्य सरकारने ठरवून दिलेली मका खरेदीची मर्यादा पूर्ण झाल्यामुळे केंद्र बंद करण्यात आली आहेत. पुढील मंजुरी आल्यानंतर ती पुन्हा सुरू केली जातील, असे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सांगितले.

हमी भाव मिळत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात मका पेरतात. एकट्या कर्जत तालुक्यातच 41 हजार टन मका उत्पादन झाले आहे. ही मका खरेदी करण्यासाठी हमी भाव केंद्रांना उशिरा परवानगी मिळाली. याशिवाय ऑनलाइन नोंदणी एकीकडे तर खरेदी केंद्र दुसर्‍या गावात अशीही परिस्थिती होती. त्यामुळे शेतकर्‍यांची धावपळ झाली. त्यातच आता पूर्ण खरेदी होण्यापूर्वीच केंद्र बंद झाली आहेत. या केंद्रावर मका घेऊन आलेले शेतकरी तेथून हलायला तयार नाहीत. मका भरलेली वाहने बंद केंद्रासमोरच उभी करण्यात आली आहेत.

 

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5570,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,2,satara,14,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10026,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,666,देश,4191,नाशिक,779,पुणे,619,बीड,1425,बुलडाणा,2,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15508,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12615,महाराष्ट्र सातारा,34,मुंबई,3471,विदेश,637,संपादकीय,1475,सातारा,3167,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: हमी भाव मका खरेदी केंद्र बंद
हमी भाव मका खरेदी केंद्र बंद
https://images2.sakalmediagroup.com/eSakal-Prod/s3fs-public/styles/generic_md_75/public/news-story/cover-images/4Maize_20esakal.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_536.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_536.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content