आता आठ महिन्यांनंतर नाट्यगृह सुरू होणार म्हटल्यावर नाट्यप्रेमी उत्सुक आहेत. आता मराठी माणूस नाट्यवेडा असतो याची प्रचिती रसिकांनी रविवारी दिल...
आता आठ महिन्यांनंतर नाट्यगृह सुरू होणार म्हटल्यावर नाट्यप्रेमी उत्सुक आहेत. आता मराठी माणूस नाट्यवेडा असतो याची प्रचिती रसिकांनी रविवारी दिली.
मुंबई : जगभरात कोरोना आला आणि सगळ ठप्प झालं. कोरोनामुळे जवळजवळ आठ महिने लॉकडाऊनमध्ये राहिल्यानंतर आता जग पूर्वपदावर येत आहे. आता आठ महिन्यांनंतर नाट्यगृह सुरू होणार म्हटल्यावर नाट्यप्रेमी उत्सुक आहेत. आता ‘मराठी माणूस नाट्यवेडा असतो’ याची प्रचिती रसिकांनी रविवारी दिली. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक हाऊसफूल झालं. या नाटकाच्या सगळे तिकिट अवघ्या तासाभरात संपले. त्यामुळे कलाकारांचा उत्साह आता द्विगुणित झाला आहे. कोरोना काळात झालल्या लॉकडाऊनमुळे मार्चपासून नाट्यगृह बंद होती. आता काही अटींसह महाराष्ट्र सरकारनं ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी, मात्र काही कलाकार आपआपल्या गावी गेल्यानं नाटकांच्या प्रयोगाला थोडा उशीर झाला. आता प्रशांत दामले आणि कविता लाड यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा शनिवारी (१२ डिसेंबर) यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे, तर रविवारी (१३ डिसेंबर) बालगंधर्व रंगमंदिर आणि प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात प्रयोग होणार आहेत. या नाटकाच्या तिकिटांची विक्री रविवारी करण्यात आली. त्यानिमित्त प्रशांत दामले आणि कविता लाड यांनी या तीनही नाटय़गृहांना भेट देऊन पहिल्या पाच नाटक प्रेमींना तिकिट दिली. यावेळी नाट्यप्रेमींच्या हस्ते नारळ फोडून तिकिट विक्रीचं उद्घाटन करण्यात आलं. अवघ्या ‘एका तासात तिकिटांची विक्री झाल्यानं मराठी माणूस नाट्यवेडा आहे’ असं मत प्रशांत दामले यांनी व्यक्त केलं. सोबतच ‘तिकिट विक्री झाल्याचा आनंद आहेच मात्र आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं दडपण आहे’, असं कविता लाड यांनी म्हटलं. या तिकिट विक्रीच्या शुभारंभावेळी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद कोथरूड शाखा, संवाद आणि पुणेकर रसिकांतर्फे दामले आणि लाड यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच या कार्यक्रमासाठी समीर हंपी, प्रवीण बर्वे, सुनील महाजन, सत्यजित धांडेकर उपस्थित होते.