$type=ticker$snippet=hide$cate=0

कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यासाठी विधिमंडळात लक्षवेधी मांडा आमदार लंके यांच्याकडे सभापती प्रशांत गायकवाड यांची मागणी

पारनेर/प्रतिनिधी ः कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या मागणीचे निवेदन आमदार निलेश लंके यांना बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळ, व्य...



पारनेर/प्रतिनिधी ः कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या मागणीचे निवेदन आमदार निलेश लंके यांना बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळ, व्यापारी, हमाल, मापाडी यांच्या वतीने देण्यात आले. यात कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यासाठी विधिमंडळात लक्षवेधी मांडा अशी मागणी आमदार लंके यांच्याकडे केली असल्याची माहिती सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या तीन वर्षापासून बाजारभाव नसल्यामुळे आर्थिक डबघाईस आलेला होता. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे कांदा या शेतमालाचे खरीप हंगामात नुकसान होऊन, कमी उत्पादन झाल्यामुळे कांदा या पिकास गेल्या दोन तीन महिन्यात बर्‍यापैकी बाजार भाव मिळत होते. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळे ऑगस्ट 2020 मध्ये निर्यांत बंदी केलेली आहे. भारत सरकारने कांदा हा जीवनावश्यक वस्तुमधून वगळलेला आहे. त्यामुळे कांदा या पिकावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध लादणे अन्यायकारक आहे. 

सध्या बाजारामध्ये येणारा कांदा हा खरीप हंगामातील असल्यामुळे त्याची साठवणूक करता येत नाही. उत्पादीत होणारा माल लवकर खराब होत असल्यामुळे तो लगेचच विक्री केल्या शिवाय शेतकर्‍यांना पर्याय नाही.त्यामुळे दररोज कांदा या पिकाचे भाव मोठया प्रमाणात कमी होत आहेत.यावर्षी कांदा बियाणेचा तुटवडा असल्यामुळे व अतिवृष्टीमुळे कांदा रोपांचे प्रचंड मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.त्यामुळे शेतकर्‍यांनी मिळेल त्या भावात कांदा रोपे खरेदी केलेले आहेत.म्हणुन यावर्षी अतिवृष्टी व रोगराई मुळे शेतकर्‍याचा उत्पादन खर्च दुप्पटीपेक्षा अधिक झालेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.त्यातच कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे मार्च 2020 पासुन शेतमालाचे बाजारभावाविषयी अनिश्‍चितता असल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्वरीत निर्यात आर्थिक बंदी मागे फटका न घेतल्यास बसत आहे. बाजारात महाराष्ट्रासह देशातील खरीप हंगामातील कांदा उत्पादकांना भाव पडून मोठा आर्थिक फटका बसत आहे बाजारात खरीप हंगामातील कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झालेली असल्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा वाढलेला आहे त्यामुळे यापुढे पूर्वठ्याची कमतरता भासणार नाही म्हणून सध्याची कांदा निर्यात बंदी उठवणे याबाबत केंद्र शासनाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.

तरी आपणास तालुक्यातील कांदा उत्पादकांच्या समस्या ची खर्‍या अर्थाने जाणीव असल्यामुळे आपल्या मार्फत येणार्‍या हिवाळी अधिवेशनात कांदा निर्यात बंदी हटवण्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित करून शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधावे. यावेळी बाजार समितीचे उपसभापती विलास झावरे, संचालक आण्णासाहेब बढे, सावकार बुचुडे, विजय पवार,संगिता कावरे, मिराबाई वरखडे, राजश्रीताई शिंदे दादा शिंदे, बबनराव कावरे, विठ्ठलराव वरखडे तसेच व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मारुती रेपाळे, किसनराव गंधाडे, उत्तम गाडगे, प्रकाशशेठ भंडारी, चंदन भळगट, आण्णा लोंढे, गोरख तामखडे, विठ्ठल कोठावळे, तुकाराम पडवळ, अविनाश काळे व इतर व्यापारी व हमाल मापाडी उपस्थित होते.


कांदा उत्पादकांचा प्रश्‍न येणार्‍या हिवाळी अधिवेशनात मांडून शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी शासनाकडे करणार असून, बाजार समितीचा रोडच्या काँक्रेटीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण  करुन देणार आहे. 

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5567,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,2,satara,12,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10020,औरंगाबाद,356,क्रीडा,675,दखल,665,देश,4188,नाशिक,779,पुणे,614,बीड,1425,बुलडाणा,2,बुलढाणा,863,ब्रेकिंग,15484,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12590,महाराष्ट्र सातारा,33,मुंबई,3462,विदेश,637,संपादकीय,1472,सातारा,3166,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यासाठी विधिमंडळात लक्षवेधी मांडा आमदार लंके यांच्याकडे सभापती प्रशांत गायकवाड यांची मागणी
कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यासाठी विधिमंडळात लक्षवेधी मांडा आमदार लंके यांच्याकडे सभापती प्रशांत गायकवाड यांची मागणी
https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcTCn_VsQi04_zzK8kXxG7N8KD9x3jCuWdYteQ&usqp=CAU
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_541.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_541.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content