बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन नवीन योजना जाहीर करत पवार...
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन नवीन योजना जाहीर करत पवारांना वाढदिवसाचे आगळेवेगळे खास गिफ्ट दिले. दिव्यांगासाठी ‘महाशरद’ योजना तर बार्टी संस्थेच्या नवीन शैक्षणिक अॅपची घोषणा मुंडे यांनी केली.
पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुंडे यांनी बीड येथून सहभागी झाले होते. मुंडे यांनी जाहीर केलेल्या योजनांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले.
‘महाशरद’ या योजनेत दिव्यांगाना मदत करण्यासाठी एक वेबसाईट व अॅप सुरू करण्यात आले आहे. यात त्यांची नोंद केल्यानंतर दिव्यांगत्व दूर करण्यासाठी लागणारी वैद्यकीय मदत व साहित्य सामाजिक संस्थांच्या मदतीतून दिले जाणार आहे. आर्थिक स्थितीमुळे अनेक दिव्यांगाना साहित्य खरेदी करता येत नाही, तर दानशूर लोकांना माहिती नसते, की कोणाला काय मदत हवी आहे? महाशरद पोर्टल व अॅपच्या माध्यमातून राज्यातील 29 लाख दिव्यांगाना मदत केली जाणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. तसेच बार्टी या संस्थेचे एक नवीन मोबाईल अँप आजपासून सुरू करण्यात आले. यात केजीपासून पीजीपर्यंत सर्व अभ्यासक्रम असणार आहेत.