माजलगाव । प्रतिनिधीः तालुक्यातील हीवरा बुद्रुक येथील गाव गुंडांनी मातंग समाजातील गोरगरीब दलित लोकांवर लहान मुला बाळासह पुरुष महिलांवरही सामु...
माजलगाव । प्रतिनिधीः
तालुक्यातील हीवरा बुद्रुक येथील गाव गुंडांनी मातंग समाजातील गोरगरीब दलित लोकांवर लहान मुला बाळासह पुरुष महिलांवरही सामुहिक प्राणघातक हल्ला केला व त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले या घटनेचा निषेध करीत माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दयानंद स्वामी कचरूजी खळगे तसेच आंबेडकर चळवळीतील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष तथा नगरसेवक विजय दादा साळवे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते धम्मानंद साळवे, अंकुशराव जाधव, मानवी हक्क अभियान चे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी या घटनेचा निषेध करीत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी नसता तिव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन आज दिनांक 16/12 /2020 रोजी बीड जिल्हा पोलीस अधिक्षक राजा स्वामी यांना देण्यात आले.
-------------