शिर्डी/प्रतिनिधी : राहाता नगरपालिकेचा अनस्थेनाचा डिसाळ कारभार शहरात पाहण्यास मिळाला. चक्क अग्निशमन दलाची गाडी पंधरा दिवसापासून बंद अवस्थेत ...
शिर्डी/प्रतिनिधी :
राहाता नगरपालिकेचा अनस्थेनाचा डिसाळ कारभार शहरात पाहण्यास मिळाला. चक्क अग्निशमन दलाची गाडी पंधरा दिवसापासून बंद अवस्थेत नगरपालिका परिसरात आढळली. विरोधकांना यामुळे एक नवीन कौल मिळालं.
पिंपळस हद्दीतील नितीन गाडेकर यांच्या उसाच्या क्षेत्रात अचानक आगीने पेट घेतल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी राहाता नगरपालिकेची संपर्क साधला. परंतु राहता नगरपालिकेत अग्निशमन दलाची गाडी पंधरा दिवसापासून बंद अवस्थेत आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली.हे कळल्यानंतर ऊस उत्पादक नितीन गाडेकर हतबल झाले. त्यांना आपला ऊस वाचण्यासाठी मोठ्या शर्तीचे आव्हान निर्माण झाले. यावेळी शहरातील शिवसेना युवा सेना हे या ऊस उत्पादकाला मदतीसाठी धावले तातडीने शिर्डी नगरपंचायती ला फोन करून अग्निशमन दलाची गाडी तातडीने बोलून घेतली. यानंतर शहरातील शिवसेना व युवा सेनेतर्फे राहता नगरपालिका हद्दीत बंद अग्निशमन दलाच्या गाडीला पुष्पहार घालून औक्षण करण्यात आले व शिर्डी अग्निशमन कर्मचाऱ्यांना साखर वाटून तोंड गोड करण्यात आले.
राहाता नगरपालिकेचे संकटाच्या काळात तोंड देण्यासाठी अग्निशामन दलाची महत्त्वाची भूमिका असताना राहाता नगरपालिकेचे प्रशासन व व्यवस्थापन यांच्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात. अग्निशमन दलाच्या वाहना करता राहाता नगरपालिकेने कायम सतर्कता बाळगणे गरजेचे असताना यासारखे प्रकार घडणे हे हास्यास्पद वाटते. अशीच परिस्थिती कायम स्वरूपी असल्यास नागरिकांचा उद्रेक होणे सहाजिकच आहे. शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी राहाता नगरपालिकेच्या अग्निशमन वाहन बद्दल विविध प्रश्नव उपस्थित केले नगरपालिकेचे व्यवस्थापन, प्रशासन निद्रिस्त अवस्थेत असल्याचे त्यांनी बोलले. यावेळी नितीन गाडेकर यांनी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे नगरसेवक सागर लुटे ,युवा सेना शहरप्रमुख भागवत लांडगे व त्यांचे सहकारी व कार्यकर्ते शिर्डी अग्निशमन दलाच्या वाहनाचे आभार मानले.