नाशिकरोड/प्रतिनिधी : नाशिकरोड रेल्वेस्थानकात वीजेच्या वायरींची दुरुस्ती करण्याचे काम नुकतेच करण्यात आले. रेल्वे महाव्यवस्थापकांचा दौरा प्र...
नाशिकरोड/प्रतिनिधी : नाशिकरोड रेल्वेस्थानकात वीजेच्या वायरींची दुरुस्ती करण्याचे काम नुकतेच करण्यात आले. रेल्वे महाव्यवस्थापकांचा दौरा प्रस्तावित असल्याने स्थानकाची रंगरंगोटीचेही काम केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रेल्वेस्थानकात रुळांवर प्रवाशी खाद्यपदार्थ टाकतात. त्यामुळे उंदीर, घुशींची संख्या वाढली आहे. ते स्थानकातील छतांवर जाऊन वीजेच्या वायरीही कुरतडतात. काही वर्षांपूर्वी त्यामुळे स्थानकात आग लागली होती. त्यामुळे वायरींची नियमित देखभाल केली जात आहे.