मालेगांव । येथील चंदनपुरी शिवारातील शेतामध्ये असलेल्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ लाख ७८ हजार १२० र...
मालेगांव । येथील चंदनपुरी शिवारातील शेतामध्ये असलेल्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ लाख ७८ हजार १२० रूपयांच्या मुद्देमालासह २७ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरूध्द किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या अधारे आज बुधवार दि. १६ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास चंदनपुरी शिवारातील विश्वनाथ सुकदेव खैरनार यांच्या शेतात पिंटू अशोक अहिरे (३६ ) रा.मोतीबाग नाका, हा जुगार अड्डा चालवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असला यात इकबाल रियाज अहमद (४२) रा.उमराबाग, राकेश आनंदा शिंदे (४५) रा.सटाणा नाका, राजेंद्र फकीरा डांगचे (५४), संगमेश्वर, शेख सलीम अल्लाउद्दीन (५१) आझादनगर, दत्तु जमलु जाधव (५१) संगमेश्वर, अतिक अहमद शुबराती (५०) अब्दुल खालील पार्क, मोहन हरिपवार (३८) सोयगांव, रूपेश भिमराव शिरसाठ (४८) मोतीबाग नाका, जुबेर शफीक अहमद (३५) रमजानपुरा, नदीम सैय्यद अहमद (३२) कुसूंबारोड, शेख शफीक अफजल (५१) अय्याज नगर, पिंटू अशोक अहिरे (३६) मोतीबाग नाका, जमील अहमद इद्रीस (६०) रविवार पेठ, शेख अब्दुल सत्तार (६४) कमालपुरा, अतिक अहमद अब्दुल रहमान (५४) रौनकाबाद, अय्युब साकीर खान (५३) रा.खालीक नगर, अशोक बाबुलाल जगताप (४६) मालेगाव कॅम्प, अफरोज शेख रमजान (५२) गुलशन नगर, शफीक खान अब्दुल (४५) गुलशन नगर, मोहम्मद हारूण शाबान (५०) फरशी नगर, मोबीन मोहम्मद इस्माईल (३५) इस्लामपुरा, शेख गाजिब इलियास (३४) आझादनगर, किसन विशालसिंग चौधरी (४०) सटाणा नाका, कमलेश पाढुरंग सुर्यवंशी (३५) संगमेश्वर, शेख राऊफ रशीद (३५) चमननगर या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्या ताब्यातून मोबाईल, दुचाकी तसेच ३ लाख २८ हजार ७२० रूपयांच्या रोख रक्कमेसह ५ लाख ७८ हजार १२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई संतोष उगले यांनी किल्ला पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या कारवाईत पोलिस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका पोलिस ठाण्याचे पो.उपनिरीक्षक जयसिंग राजपुत, पोशी अरूण बन्से तसेच किल्ला पो.ठाण्याचे पो.नि. दिंगबर भदाणे,पोउनि बाळासाहेब खरगे, पो.ह.सुर्यवंशी, पो.ना. बागुल, पोशि नितीन पांढरे, पप्पु अहिरे, आदींचा या कारवाईत समावेश होता.