संगमनेर/प्रतिनिधी : महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संघटन उभे करून त्यांचा न्याय्य हक्कांसाठी ...
संगमनेर/प्रतिनिधी : महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संघटन उभे करून त्यांचा न्याय्य हक्कांसाठी एक व्यासपीठ निर्माण केले आहे. अनिल भोसले सारख्या युवकाने गेल्या वीस वर्षापासून समाजाच्या तळागाळात जाऊन सर्व पंथीय ख्रिस्ती चर्चेचे सहकार्य व विश्वास घेऊन समाजाची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.
यशोधन कार्यालयात झालेल्या सहविचार सभेत ते बोलत होते. यावेळी अल्पसंख्यांक आयोग, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ तसेच शासकीय समित्या यावर निश्चितच काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात ख्रिस्ती समाजाला न्याय देतील असा विश्वास सहविचार सभेत व्यक्त करण्यात आला. ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने कार्यकर्त्यांनी शासनाच्या योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला आहे. यावेळी आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, किशोर साठे, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, प्रा. अमोल साळवे यांचा आमदार डॉ. तांबे यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.