भारत पेट्रोलियम तर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन कुडाळ / वार्ताहर : आधुनिक शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी शेतकरी मेळावा मार्गदर्शन ठरेल. याद्...
भारत पेट्रोलियम तर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन
कुडाळ / वार्ताहर : आधुनिक शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी शेतकरी मेळावा मार्गदर्शन ठरेल. याद्वारे शेतकर्यांना फायदा होईल, असे मत तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी व्यक्त केले.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने कुडाळ येथील सह्याद्री पेट्रोलियम याठिकाणी शेतकर्यांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
पोळ पुढे म्हणाले, शेतकर्यांसाठी सह्याद्री पेट्रोलियमने राबवलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. शेत जमीन नोंदी आणि व्यवहार या बाबी तहसील कार्यालय करत असून आपण पण आपले रेकॉर्ड अद्यावत ठेवणे गरजेचे आहे. तालुक्यातील 7/12 संगणकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून आपल्या अचुक नोंदीसाठी शेतकर्यांनी दक्षता घ्यावी आणि भविष्यातील वाद टाळावेत. अजूनही कोरोनाची परिस्थिती बदललेली नाही यासाठी आपण सर्वांनीच सावधानता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी भारत पेट्रोलियमचे सेल्स मॅनेजर भानुप्रताप यांनी पेट्रोल खरेदी करत असताना भेसळ कशी ओळखावी याचे प्रात्यक्षिक दाखवून ग्राहकांच्या हक्कांची माहिती देत कंपनीद्वारे कोणत्या सुविधा पुरवल्या जातात हे सांगितले.
सी एच विनोद साहेब म्हणाले, कोरोनाच्या कठीण काळात सह्याद्री पेट्रोलियम शेतकर्यांसाठी उत्तम सुविधा दिली आहे. ग्रामीण भागातील शेतकर्यांसाठी आमच्याकडून दरवर्षी अशा मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. आपल्या मार्गदर्शनासाठी आमचे हे दालन कायमच खुले आहे. सह्याद्री पेट्रोलियमच्या माध्यमातून आपणासाठी पारदर्शी पुरवठा होत आहे, याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा.
या कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, उपसभापती सौरभ शिंदे, शेतकरी संघटनेचे पश्चिम विभागीय प्रमुख कमलाकर भोसले, माजी सरपंच वीरेंद्र शिंदे, रवींद्र परामने, महिला आघाडी प्रमुख रूपालीताई भिसे, रामदास पार्टे आदी मान्यवर बचत गटाच्या महिला व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार इम्तियाज मुजावर यांनी केले. विकास मोहिते यांनी आभार मानले.