सटाणा ( कार्यालय प्रतिनिधी.) केंद्र सरकारने शेतकरी विरोधी भुमिका घेत असल्याने त्याच्या निषेधार्थ आज भारत बंदची हाक दिली असता बागलाण तालुक्...
सटाणा ( कार्यालय प्रतिनिधी.) केंद्र सरकारने शेतकरी विरोधी भुमिका घेत असल्याने त्याच्या निषेधार्थ आज भारत बंदची हाक दिली असता बागलाण तालुक्यात याला शंबर टक्के प्रतिसाद मिळाला असुन महाविकास आघाडी ने याला जाहिर पाठींबा दिला होता.
सध्या दिल्ली व हरियाणा येथे शेतकरी आंदोलन सुरू असुन अद्याप पर्यंत त्यावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने सर्व शेतकरी केंद शासनाच्या विरोधात एटावला आहे. त्यातच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी जाहिर केल्याने बळीराजा हतबल झाला होता. अनेक वेळा मागणी करूनही शासनाने बळीराजा ची मागणी मान्य केली नाही. त्याच्या निषेधार्थ आज बळीराजा ला पाठींबा देण्यासाठी भाजपा सोडून सर्व राजकीय पक्षांनी भारत बंद ची हाक दिली होती.
बागलाण तालुका व सटाणा शहरातील या बंदचे आवाहन महाविकास आघाडी ने केले होते. माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, इंदिरा काँग्रेस, शिवसेना व प्रहार शेतकरी संघटनेने याला जाहिर पाठींबा दिला होता. त्या मुळे संपुर्ण बागलाण तालुक्यात बंदला ७० टक्के तर सटाणा शहरात बंदला शंबर टक्के प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यापारीं समाजाने आपआपले व्यवसाय बंद करून बळीराजाला जाहिर पाठिंबा दिला.
*प्रहार संघटनेने केला आगळा वेगळा निषेध*
या वेळी सटाणा शहरात प्रहार संघटनेने बंदला जाहिर पाठिंबा देवून नेहमीप्रमाणे प्रहार स्टाईल ने निषेध व्यक्त केला. शहरातील प्रहार सैनिक व व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रस्त्यावर भारताचा नकाशा करून नकाशा च्या मध्य भागी हतबल बसलेल्या शेतकरी व झाडावर गळफास घेवून आपली जिवन यात्रा संपवलेला बळीराजाची प्रतिकृती बनवून येणार्या जाणार्या चे लक्ष वेधून घेतले होते. त्या प्रतिकृती तुन प्रहार संघटना पाठीशी असल्याने चित्र रंगवले होते.
या वेळी प्रहार चे तालुका अध्यक्ष तुषार खैरनार, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष कपिल सोनवणे, शहर अध्यक्ष रुपेश सोनवणे, दिव्यांग संघटनेचे नाना कुमावत, राजु जगताप, कृष्णा जगताप, नितीन कापुरे, दादाभाऊ व्यंगचित्रकार किरण मोरे, हे उपस्थित होते.
Attachments area