नवी दिल्ली : ’ दिल्ली जल बोर्डा’वर भ्रष्टाचाराचा आरोप करत भाकतीय जनता पक्षाच्या काही गुंडांनी बोर्डाच्या मुख्यालयावर हल्ला केला. पोलिसांनी उ...
नवी दिल्ली : ’दिल्ली जल बोर्डा’वर भ्रष्टाचाराचा आरोप करत भाकतीय जनता पक्षाच्या काही गुंडांनी बोर्डाच्या मुख्यालयावर हल्ला केला. पोलिसांनी उभारलेले बॅरिकेडस तोडून या लोकांनी कार्यालयात प्रवेश मिळवला तसेच त्यांनी कार्यालयातही तोडफोड केली. भाजपच्या कार्यकत्यार्ंनी हे केले असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
प्रदेश भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता, दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीरसिंग बिधुरी यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी जल बोर्डाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. या आंदोलनकर्त्यांच्या हातात काही पोस्टरही होते. या पोस्टरवर ’आम आदमी पक्षा’विरोधात घोषणा लिहिलेल्या होत्या. ’जल बोर्ड हा भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे. टँकर माफियांचा इथे बोलबाला आहे. लोकांच्या घरी दूषित पाणी पोहचवले जात आहे. लोकांना टँकर माफियांकडून पाणी खरेदी करून प्यावे लागत आहे’, असे अनेक आरोप या वेळी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. कार्यालयात ठेवण्यात आलेल्या अनेक वस्तूंची आंदोलकांनी तोडफोड केली. त्यानंतर ते तिथून निघून गेले.
जल बोर्डाचे उपाध्यक्ष आणि आमदार राघव चड्ढा यांनी भाजप नेत्यांवर गुंडागर्दीचा आरोप केला आहे. तसेच ’भाजपच्या गुंडांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना सांगा, की शेतकर्यांच्या आंदोलनातून माघार घ्यावी, अन्यथा आपच्या नेत्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर असे हल्ले होतच राहतील,’ अशी धमकी दिल्याचाही आरोप चड्ढा यांनी केला आहे. भाजपच्या गुंडांनी कार्यालयाचे मोठे नुकसान केले. दिल्ली जल बोर्डाच्या मते, सरकारी कार्यालयात अशा प्रकारची तोडफोड करणे हे अत्यंत निंदनीय आहे. जल बोर्डाकडून या प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल’ असे चड्ढा यांनी म्हटले आहे.
पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी ट्विट करत या घटनेची निंदा केली. ’देशाच्या राजधानीत ही काय गुंडागर्दी आहे. अगोदर अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, त्यानंतर मनीष सिसोदिया यांच्या कुटुंबावर हल्ला आणि आता राघव चड्ढा यांच्या कार्यालयावर प्राणघातक हल्ला... अमित शाह अजूनही निवडणुकीतील पराभव विसरू शकलेले नाहीत, हे लोक आता रक्तरंजित मारहाणीवर उतरले आहेत,’ असे ते म्हणाले.
गुंडागर्दीचे नाव भाजप!
’भाजपचे लोक आता दिवसाढवळ्या गुंडगिरी करत घरांमध्ये आणि कार्यालयात घुसत आहेत आणि पोलिस त्यांना संरक्षणाखाली आणत त्यांच्याकडून हल्ले करवून घेत आहेत. गुंडागर्दीचे दुसरे नाव भाजप आहे,’ अशी टीकाउपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली.