कराड / प्रतिनिधी ः डिचोली (ता. कराड) गावच्या हद्दीत सोमवारी सकाळी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. याबाबतची खबर वासुदेव...
कराड / प्रतिनिधी ः डिचोली (ता. कराड) गावच्या हद्दीत सोमवारी सकाळी एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. याबाबतची खबर वासुदेव अरविंद जोशी (वय 45 रा. पारीजात अपार्टमेंट, तिसरा मजला, सोमवार पेठ, कराड) यांनी शहर पोलिसात दिली आहे.
गायत्री मोहन जोशी (वय 15 वर्षे 8 महिने रा. पारीजात अपार्टमेंट, तिसरा मजला, सोमवार पेठ, कराड) असे मृत मुलीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेल्या चार दिवसापूर्वी कराड शहर पोलिसात अज्ञाताने एका अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची फिर्याद दाखल होती. याबाबत पोलिस तपास करत होते. सोमवार, दि. 14 डिसेंबर रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास डिचोली गावच्या हद्दीत डोंगराकडील बाजूच्या कोपर्या शेताजवळील काढलेल्या सिमेंटच्या रिकाम्या गटारामध्ये गायत्रीचा मृतदेह आढळून आला. तरी मयत कशाने झाले आहे. याचा तपास पोलिसांनी करावा, असे खबर देणार वासुदेव जोशी यांनी केली आहे. अधिक तपास सपोनि राहुल वरोटे करत आहेत.