$type=ticker$snippet=hide$cate=0

चीन-नेपाळ मैत्रीत दुरावा

      भारताशी असलेली मैत्री कमी करून नेपाळनं ड्रॅगनच्या तोंडात हात घातला. ड्रॅगनकडून कोट्यवधी रुपयांची लाच घेऊन नेपाळचे सत्ताधारी आपलं इमान ...


 

 

 भारताशी असलेली मैत्री कमी करून नेपाळनं ड्रॅगनच्या तोंडात हात घातला. ड्रॅगनकडून कोट्यवधी रुपयांची लाच घेऊन नेपाळचे सत्ताधारी आपलं इमान विकत आहे. त्याचा फटका आता नेपाळला बसत असून चीननं नेपाळचा भूभाग गिळंकृत केला आहेच; परंतु आता कोरोनाचं निमित्त पुढं करून चीननं नेपाळच्या मालावर गेल्या दहा महिन्यांपासून बंदी घातली आहे. भारताकडून आयात वाढविणारा चीन त्याचवेळी नेपाळची मात्र कोंडी करतो, हे आता नेपाळच्याही लक्षात आलं आहे.

 

इंग्रजीत एक म्हण आहे, ती म्हणजे ए फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इनडीड. तिचा व्यापक अर्थ लावायचा झाला, तर मैत्री देण्या-घेण्यावर अवलंबून असत नाही. ती निख्खळ असते. तिचा पाया विश्‍वास असतो. मैत्रीचा पाया अशा भक्कम विश्‍वासावर असला, तर कोणत्याही संकटावर मित्राच्या मदतीनं मात करता येते. सुखाच्या काळात मित्र बरोबर नसला, तरी चालेल; परंतु दुःखाच्या काळात त्यानं न सांगता पाठीमागं खंबीरपणे उभे राहायला हवं. मित्राची अडचण करून तिचा गैरफायदा घेणारा मित्रच नव्हे. चीनचे त्याच्या मित्रदेशांशी वागणं पाहिलं, तर कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, असं म्हणण्याची वेळ येते. चीन कायम मैत्रीपेक्षा स्वतःच्या आर्थिक फायद्याला महत्त्व देत असतो. चीनचे मालदीव, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका आदी देशांशी संबंध याच प्रकारचे आहेत. आता मालदीव चीनपासून दूर गेला आहे. श्रीलंकेचं हंबनटोटा बंदर चीननं स्वतःच्या घशात घातलं आहे. त्यामुळं श्रीलंकाही चीनपासून हातचं अंतर राखून आहे. पाकिस्तानच्या ग्वादर बंदराबाबतही चीन तेच करण्याची शक्यता आहे. नेपाळ हा तर चीनचा सर्वांत जवळचा मित्र. चीननं या मित्राचाही विश्‍वासघात केला आहे. ज्या कोरोनाची निर्मिती चीनच्या वुहान प्रयोगशाळेत झाली, त्याच चीनवर जगानं बहिष्कार घातला असताना चीन मात्र नेपाळमधून येणा-या वस्तूंवरच कोरोनाच्या भीतीनं बंदी घातली आहे. भारतातून चीननं आयात वाढविली असताना तोच चीन आपल्या मित्राची कोंडी करीत आहे. कोरोनाच्या काळात नेपाळमधून येणार्‍या वस्तू चीननं अडवून धरल्या आहेत. गेल्या दहा महिन्यांपासून नेपाळमधील 1200 कंटेनर तिबेट सीमेवर अडकले आहेत. नेपाळी उद्योजक राम पौडेल यांनी या प्रकारांमुळं आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबाच्या मते, राम यांनी दोन कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. माल अडकल्यामुळं ते हप्ता भरण्यास असमर्थ होते. चीनी कस्टम अधिकारी सर्वसाधारणपणे नेपाळ कामगारांची कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी स्वीकारत नाहीत. त्यामुळं नेपाळी कामगारांवार संशय घेऊन मालाची चढउतार करू दिली जात नाही. चीनमधून नेपाळला जाणार्‍या वस्तू जमिनीमार्गे आणण्यासाठी नेपाळ सरकार व्यापार्‍यांना पवृत्त करीत आहे. कोलकाता बंदरमार्गे वस्तू आणण्यास सांगितलं जात आहे. त्याचा भुर्दंडही आता नेपाळला भरावा लागत आहे. नेपाळी अधिकारीच चीनवर आरोप करताना तो सहकार्य करीत नाही, असं सांगत आहेत. कोरोना संपल्यानंतर माल पुढं जाईल, असं चीन सांगतो आहे. तिबेटच्या सीमेवर अडकलेल्या कंटेनरमध्ये लोकरीच्या कपड्यांचे कंटेनरही आहेत. तिबेटची राजधानी ल्हासा, शिगात्से, न्यालम, केरुंग इत्यादी ठिकाणी हे कंटेनर अडकले आहेत. नेपाळी व्यापार्‍यांच्या मते, तिबेट शहरांमध्ये अडकलेल्या वस्तूंचं मूल्य 1300 कोटी रुपये आहे. चीननं हा अघोषित अडथळा आणल्यानं नेपाळचे मोठं नुकसान आहे. आपत्कालीन परिस्थितीतही पुरवठा रोखता येत नाही. त्याच वेळी, चिनी सीमाशुल्क एजंटांना माल पाठविण्यासाठी लाच द्यावी लागते. तसं न केल्यास चिनी एजंट माल पाठवत नाही.

 

चीन आणि नेपाळमध्ये व्यापाराच्या दृष्टीनं रसुवागडी-केरुंग आणि तातोपानी-खासा असे दोन सीमाबिंदू आहेत. तातोपानी हा जुना केंद्रबिंदू आहे. हे केंद्र  2015 च्या भूकंपानंतर बंद झालं होतं; परंतु गेल्या वर्षी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नेपाळच्या दौर्‍यावर आल्यानंतर ते उघडण्यात आलं. चीननं आंतरराष्ट्रीय सीमा बिंदू केरुंग-रसुवागडी म्हणून विकसित केली आहे. चीन नेपाळहून केरुंगमार्गे केवळ पाच कंटेनर आणि टाटोपाणी-खासामार्गे दोन कंटेनरला परवानगी देत आहे. पूर्वी दररोज 30 ते 40 कंटेनर वस्तू येथून जात असत. नेपाळ आणि चीन दरम्यान 13 सीमाबिंदू उघडण्यास चीननं शाब्दिक सहमती दर्शविली होती; परंतु चीननं दोन सीमांवरसुद्धा आयात, निर्यात सुलभ केली नाही. त्याचा फटका थेट सामान्यांना बसला आहे. बड्या व्यापार्‍यांनी चीनच्या शहरांमधून भारताच्या कोलकाता बंदरावर माल पाठविला आहे. वस्तू कोलकाता बंदरमार्गे चीनमधून नेपाळला 35 दिवसांत परत येऊ शकतात. या वर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा होती; परंतु आतापर्यंत 100 कोटी रुपयेही मिळाले नाहीत. या मार्गावरील सुमारे 800 कंटेनर तिबेटच्या बाजूनं अडकले आहेत. सीमाशुल्क अधिकार्‍यांनी चीनकडून कंटेनर मिळविण्यासाठी स्वतंत्र यार्ड तयार केले आहेत. नेपाळी कामगारांना इथं तैनात केले आहे; परंतु कोरोनाच्या धास्तीनं चिनी अधिकारी कंटेनर पाठविण्यास टाळाटाळ करतात. एकीकडं चीन अशी व्यापारी मार्गानं कोंडी करीत असताना भारताविरोधात कारवाया करणार्‍या नेपाळला आता मोठा धक्का बसला आहे. सातत्यानं चीनधार्जिणी भूमिका घेणार्‍या नेपाळला आता ड्रॅगनचा कावा समजू लागला आहे. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या मौनाचा फायदा घेत चीननं नेपाळमध्ये हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. नेपाळच्या कृषी मंत्रालयानं केलेल्या सर्वेक्षणानुसार, चीननं एक नव्हे, तर सात सीमावर्ती जिल्ह्यांवर अवैध पद्धतीनं कब्जा केला आहे. चीन अतिशय वेगानं आगेकूच करत असून अधिकाधिक जमिनीवर अतिक्रमण सुरू आहे. चीननं नेपाळमधील सातपेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये घुसखोरी केल्याचा तपशील नेपाळच्याच कृषी मंत्रालयाच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे;  मात्र जमिनीवरील परिस्थिती आणखी भीषण असू शकते, अशी शक्यता नेपाळच्या परराष्ट्र धोरणाच्या अभ्यासकांनी व्यक्त केली. नेपाळ कम्युनिस्टी पार्टीनं (एनसीपी) नेहमीच चिनी कम्युनिस्टी पार्टीच्या (सीसीपी) विस्तारवादी धोरणावर पांघरुण घालण्याचं काम केले आहे. त्यामुळं प्रत्यक्षातील स्थिती आणखी गंभीर असू शकते. चीननं नेपाळच्या आणखी काही भागांवर कब्जा केला असावा, अशी शंका घेतली जात आहे. नेपाळमधील अनेक गावांवर चीननं अतिक्रमण केलं आहे; मात्र चीनला नाराज करायचं नसल्यानं नेपाळमधील ओली सरकार शांत आहे. चीननं दोलखा, गोरखा, दारचुला, हुमला, सिंधुपालचौक, संखुवासभा आणि रसुवा जिल्ह्यांमध्ये अतिक्रमण केलं आहे. हे जिल्हे बळकावण्याचे प्रयत्न चीनकडून सुरू आहेत.

 

नेपाळ आणि चीनमध्ये असलेल्या सीमा वादावरील बैठका सुरू ठेवण्यास नेपाळ फारसा उत्सुक नाही. 2005 पासून नेपाळची हीच भूमिका आहे. चीन नाराज होईल, या भीतीनं नेपाळ सरकार ड्रॅगनच्या अतिक्रमणावर आक्षेप घेत नाही. त्यामुळं नेपाळ सरकारला जनतेच्या नाराजीचा सामना करावा लागतो. सीमा वादावरील बैठका सुरू झाल्यास नेपाळला चीनच्या अरेरावीशी दोन हात करावे लागतील. त्यामुळे 2012 मध्ये नेपाळनं सीमा वादावरील बैठकाच स्थगित केल्या.

नेपाळला आपली काही बंदरं वापरण्याची परवानगी चीननं दिली आहे. चीननं घेतलेल्या सैन्य अभ्यासातही नेपाळनं भाग घेतला. दुसरीकडं चीनने नेपाळमध्ये बरीच गुंतवणूक केली आहे. चीन नेपाळचा भूभाग घशात घालत असतानाही नेपाळ मात्र भारताच्या जखमेवर मीठ चोळत आहे. भारताबरोबरच्या सैन्य अभ्यासातून माघार घेण्यामागं नेपाळमधील अंतर्गत राजकीय परिस्थिती कारणीभूत असल्याचीही चर्चा आहे. भारताला यामध्ये तथ्य वाटत नाही, कारण नेपाळमध्ये ओली यांच्या सरकारकडं दोन तृतीयांश बहुमत आहे. अशा परिस्थितीत ओली सरकार दबाव येऊन निर्णय घेण्याची परिस्थितीच नाही. या सगळ्या घडामोडींबाबत नेपाळच्या दिल्लीस्थित दूतावासानंही कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. नेपाळ हा पूर्णभूवेष्टित देश आहे. त्यामुळं बंदरासाठी नेपाळ भारतावरचं अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. चीननं थिंयान्जिन, शेंजेन, लिआनीयुगैंग, श्यांजियांग या बंदराचा उपयोग करण्याची परवानगी नेपाळला दिली असल्याचं त्यांच्या वाणिज्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. याव्यतिरिक्त लँड पोर्ट लोंजोऊ, लासा आणि शिगैट्सच्या वापराला तात्विक अनुमती मिळाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. चीन आणि भारत या दोन्ही शेजारी देशांशी असलेल्या संबंधांमध्ये संतुलन राहावं यासाठी ओली प्रयत्नशील आहेत. ओली एकेकाळी भारतसमर्थक असल्याचं मानलं जातं होतं. नेपाळच्या राजकारणात त्यांची भूमिका भारतस्नेही अशीच होती. नेपाळवर अनेक वर्षे भारताचा प्रभाव आहे. दोन्ही देशांची सीमा खुली आहे. दोन्ही देशांदरम्यान मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो. दोन्ही देशात हिंदूधर्मीयांची संख्या खूप आहे. चालीरीती बर्‍याचशा सारख्या आहेत; मात्र तरीही दोन्ही देशांचे संबंध बिघडत चालले आहेत. चीननु गेल्या काही वर्षात नेपाळमध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे. नेपाळमध्ये चीनचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये मूलभूत सोयीसुविधांसंदर्भातील योजना सर्वाधिक आहे. चीन नेपाळमध्ये विमानतळ, रस्ते, रुग्णालयं, महाविद्यालयं, मॉल्स तयार करत आहे. चीन नेपाळमध्ये रेल्वेसेवा सुधारण्यासाठी काम करत आहे. या पार्श्‍वभूमीवर चीननं काहीही केलं, तरी नेपाळ सरकार काहीच बोलत नाही; परंतु आता तेथील युवक नेपाळ सरकार आणि चीनविरोधात आवाज उठवित आहेत. 

Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5550,letest News,584,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,3,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9974,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,660,देश,4147,नाशिक,776,पुणे,590,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15360,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12457,महाराष्ट्र सातारा,26,मुंबई,3442,विदेश,635,संपादकीय,1465,सातारा,3157,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: चीन-नेपाळ मैत्रीत दुरावा
चीन-नेपाळ मैत्रीत दुरावा
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_594.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_594.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content