पारनेर/प्रतिनिधी ः निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, पारनेर तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार ...
पारनेर/प्रतिनिधी ः निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, पारनेर तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे संपूर्ण तालुक्यात 11 डिसेंंबर पासून ते 18 जानेवारीपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
पारनेर तालुक्यातील 114 पैकी 88 ग्रामपंचायतीची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे दि.15 पासून ही प्रक्रिया सुरू होत आहे तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्या धर्तीवर सर्वच राजकीय पक्षाचे प्रमुख लोकप्रतिनिधी कार्यकर्ते यांची बैठक तहसिल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी या सर्व कार्यकर्त्यांना प्रशासनाच्यावतीने निवडणुकीबाबत मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या. तसेच ही निवडणूक पार पडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे व आचारसंहिता सुरू असल्याने त्याचे काटेकोरपणे पालन करावे असे अहवान तहसिलदार ज्योती देवरे यांनी केले. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. या काळात व या क्षेत्रात मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती घोषणा मंत्री खासदार आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकार्यांना आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही.
-------------------------
उपजिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार तसेच उपसचिव महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रानुसार तालुक्यातील 88 ग्रामपंचायतचे सरपंच आरक्षण सोडतीचा मंगळवार 15 डिसेंबर रोजीचा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून हा कार्यक्रम निवडणूक निकालानंतर घेण्यात येणार आहे.
ज्योती देवरे, तहसिलदार पारनेर