चंपावती प्लायवूड दुकानाच्या गोडाऊनमध्ये घडली घटना एकाची प्रकृती गंभीर घटनास्थळी बॉम्ब शोधक,दहशतवादीविरोधी पथकासह श्वान पथक दाखल बीड । प्रतिन...
चंपावती प्लायवूड दुकानाच्या गोडाऊनमध्ये घडली घटना
एकाची प्रकृती गंभीर
घटनास्थळी बॉम्ब शोधक,दहशतवादीविरोधी पथकासह श्वान पथक दाखल
बीड । प्रतिनिधीः-
चंपावती प्लायवुडच्या गोडाऊनमध्ये आज दुपारी केमिकलचा जबरदस्त स्फोट झाल्याने या स्फोटात एक कामगार जागीच ठार झाला तर अन्य दोघे जखमी झाले असून यात एकाची प्रकृती गंंभीर असल्याचे सांगण्यात येते. सदरचा स्फोट हा हार्डनर या केमिकलचा झाला असून या स्फोटाची तिव्रता एवढी भयानक होती की, यातील मृत्यूमुखी पडलेला कामगार स्फोटानंतर थेट गोडाऊनच्या बाहेर रिक्षावर जावून आदळला.
एवढेच नव्हे तर गोडाऊनपासून काही अंतरावर असलेल्या महालक्ष्मी हॉस्पिटलच्या काचा फुटल्या. या स्फोटाने परिसरात काही काळ भितीचे वातावरण निर्माण केले. सदरचा स्फोट हा मसरत नगर भागात घडला. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक, दहशतवादीविरोधी पथक, श्वान पथक आणि बीड शहर ंपोलीस धावले. बीड शहरातील चंपावती प्लायवुड या दुकानाचे मसरत नगर भागात गोडाऊन आहे. आज सकाळी गोडाऊनमध्ये अनिरूद्ध पांचाळ (वय 27) हा कामगार आणि अन्य एक कामगार आपले काम करत होता. यावेळी हार्डनर या केमिकलचा कँडचे टोपन उघडण्यासाठी अनिरूद्ध पांचाळ हा गेला तो टोपण उघडत असतांना अचानक हार्डनर या केमिकलचा मोठा स्फोट झाला. स्फोटाची तिव्रता एवढी भयानक होती की अनिरूद्ध हा गोडाऊन बाहेर उभ्या असलेल्या रिक्षा आणि स्कुटीवर जावून आदळला. या स्फोटात अनिरूद्धचे दोन्ही हात पंजापासून अक्षरश: विखुरले गेले. तर एक पाय गुडघ्यापासून खाली वेगळा झाला. त्याचे तुकडे गोडाऊनमध्ये पसरल्याचे हृदयद्रावक चित्र समोर दिसत होते. यातच त्याचा मृत्यू झाला. या स्फोटामध्ये गोडाऊन बाहेर उभा असलेला रिक्षा क्र.एम.एच.23-7166 आणि स्कुटी एम.एच.23 बी.ए.4850 यांचे नुकसान झाले. स्फोटामध्ये रिक्षा चालक सुधीर जगताप याच्यासह किसन मुणे हा कामगार जखमी झाला असून यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.स्फोट एवढा भयानक होता की गोडाऊन जवळ असलेल्या महालक्ष्मी हॉस्पिटलच्या काचा फुटल्या. स्फोटाच्या तिव्रतेने या भागात धरणीकंप झाल्याचा भाव अनेकांना झाला. काही काळ या भागात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक, दहशतवादीविरोधी पथक, श्वान पथक व बीड शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय सानप, दहशतवादी पथकाचे मोरे, जोगदंड, सांगळे, घोडके, चौरे, घोंबडे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी सुरू असून हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याचा शोध पोलीस घेत आहेत.