$type=ticker$snippet=hide$cate=0

दरोडयाच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक

घारगाव पोलिसांची कारवाई ; पिकअपसह दरोड्याचे साहित्य केले जप्त  टोळीतील पाचपैकी दोघे अल्पवयीन संगमनेर/प्रतिनिधी ः दरोडा टाकण्याच्या तयारीत अ...


घारगाव पोलिसांची कारवाई ; पिकअपसह दरोड्याचे साहित्य केले जप्त 

टोळीतील पाचपैकी दोघे अल्पवयीन



संगमनेर/प्रतिनिधी ः दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घारगाव पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून पोलिसांनी पिकअपसह दरोड्याचे साहित्य जप्त केले आहे. तर टोळीतील पाच जणांपैकी दोघेजण अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या टोळीला दरोडा कुठे टाकायचा होतो हे मात्र अद्याप समजू शकले नाही. परंतु पोलिसांनी वेळीच त्यांचा बंदोबस्त केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी मध्यरात्री घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, चालक बिरे हे परिसरात सरकारी पोलीस वाहनातून गस्त घालत होते. त्याचवेळी पोलीस निरीक्षक पाटील यांना गुप्त खबर्यामार्फत फोन आला की, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे येथील पुलाखाली अंधारामध्ये एक पिकअप थांबली असून, अंधाराचा फायदा घेऊन पाच जण दबा धरून बसले आहे. माहिती मिळताच पथक घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी त्यातील तिघांना कसोशीने पकडले. त्याचवेळी दोघे जण पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत मोठ्या शिताफीने त्यांचाही बंदोबस्त केला. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता सतीश उर्फ चिक्या बाळू वाळे  (वय 20), संतोष जालिंदर गुरुकुले (वय 20) व श्याम रामकृष्ण मोरे (वय 24) सर्वजण झोळे येथील असून इतर दोघे अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडे एक पिकअप, दोन लोखंडी पाईप, एक लोखंडी पहार, एक हेक्सपान, एक लोखंडी पक्कड मिळून आली आहे. तसेच प्लास्टिक पिशवीमध्ये मिरची पूड मिळून आली. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने हे सर्वजण येथे मिळून आले. या प्रकरणी पोलीस कॉन्सटेबल हरिश्‍चंद्र बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी वरील तरुणांविरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 439/2020 भादंवि कलम 399, 402 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत हे करत आहे.

Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5554,letest News,585,Loksabha-2019,164,Maharashtra,104,Mumbai,41,New Window,210,News,315,satara,8,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,138,अहमदनगर,9990,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,663,देश,4162,नाशिक,776,पुणे,599,बीड,1424,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15403,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12504,महाराष्ट्र सातारा,27,मुंबई,3450,विदेश,637,संपादकीय,1469,सातारा,3159,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: दरोडयाच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक
दरोडयाच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक
https://static.langimg.com/thumb/msid-71665996,imgsize-24382,width-540,height-405,resizemode-75/maharashtra-times.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_604.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_604.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content