शेनित/प्रतिनिधी : इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत अधरवड येथील डोंगराळ भागातील तारीचा मोढा आदिवासी कातकरी वस्तीतील ग्रामस्थांचा पिण्याच्या पा...
शेनित/प्रतिनिधी : इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत अधरवड येथील डोंगराळ भागातील तारीचा मोढा आदिवासी कातकरी वस्तीतील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा पाणी प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून ऐरणीवर होता.उन्हाळ्यात येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करत मैलोनमैल वणवण फिरावे लागत होते.ग्रामपंचायत कडून वेळोवेळी टँकर ने पाणीपुरवठा होणार्या या तारीचा मोढा वस्तीतील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर सुटला आहे. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांच्या प्रयत्नातून पाणी मिळणार आहे. ग्रामपंचायत अधरवड यांच्या पाठपुराव्याने कायम उपेक्षित असलेल्या डोंगर उतारावरील आदि कातकरी बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून पिण्याच्या पाण्याची नवीन विहीर मंजूर करण्यात आली आहे.या नवीन विहिरीसाठी साडेसात लक्ष रुपयांचा निधी मंजूर असून जि प सदस्य हरिदास लोहकरे यांनी या कामाचे भूमिपूजन केले .याप्रसंगी सरपंच ज्ञानेश्वर डमाळे,उपसरपंच सागर ब-हे,पंढरीनाथ बरे,ग्रामपंचायत सदस्य उमेश ब-हे,संदीप महाले,ग्रामसेवक बंजारा,ग्रामपंचायत सदस्य अजय बांडे,सुदाम पगारे,विष्णू रण आदींसह आदिम कातकरी समाज बांधव उपस्थित होते.