मुंबई : रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी नव वर्षानिमित्त खास भेट आणली आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओकडून इंटरकनेक्ट वापर शुल्क (आययूसी) ...
मुंबई : रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी नव वर्षानिमित्त खास भेट आणली आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओकडून इंटरकनेक्ट वापर शुल्क (आययूसी) रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या सूचनेनुसार जिओने गुरुवारी एक निवेदन सादर केले. १ जानेवारी पासून देशात 'बिल अँड कीप राऊंड' लागू होत आहे. त्यानुसार जिओ ग्राहकांना सर्व नेटवर्कवर घरगुती व्हॉईस कॉलचा आनंद घेता येणार आहे. यापूर्वी ग्राहकांना योजनेच्या काही मिनिटांनंतर, दुसर्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी शुल्क भरावे लागत होते. मात्र आता जिओ ग्राहकांना सर्वांशी विनामूल्य बोलता येणार आहे.