$type=ticker$snippet=hide$cate=0

जामखेडच्या अस्तित्वहीन काँग्रेसला कोण देणार ऊर्जितावस्था ?

  कागदावरचे बडे नेते रस्त्यावरची लढाई कधी लढणार ?  यासीन शेख/जामखेड : काँगे्रस पक्षाची स्थापना 28 डिसेंबर 1885 मध्ये झाली. तेव्हापासून स्वात...

 




कागदावरचे बडे नेते रस्त्यावरची लढाई कधी लढणार ? 

यासीन शेख/जामखेड : काँगे्रस पक्षाची स्थापना 28 डिसेंबर 1885 मध्ये झाली. तेव्हापासून स्वातंत्र्य भारतातही काँगे्रसचा बोलबोला होता. मात्र मोदी लाटेमुळे काँगे्रसची पुरती वाताहात झाली आहे. आज मोदी सरकारच्या विरोधात शेतकरी, कामगार, सर्वसामान्यांचा रोष असतांना, हा रोष कॅच करतांना काँगे्रस कुठेतरी कमी पडतांना दिसून येत आहे. सर्वसामान्यांसोबत असलेली नाळ तुटल्यामुळे, तालुका, जिल्हा स्तरावर काँगे्रसचे अस्तित्व कमी पडू लागले आहे. 

मागील अनेक वर्षांपासून स्थानिक नेतृत्वाच्या अनास्थेमुळे  तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोठेही काँग्रेसला प्रतिनिधीत्व मिळवता नाही. थंडीच्या कडाक्यातही जामखेड तालुक्यातील निवडणूक वातावरण गरम होण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. जामखेड नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम चालू आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी लागु शकतो. याचदृष्टीने सर्व छोटे बडे पक्ष निवडणुकीचे मैदानात लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर इच्छूक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधण्याच्या तयारीला लागले आहेत.

मात्र काँग्रेस पक्षाच्या गोटात आद्यप सामसूम दिसत आहे. मृत अवस्थेत असलेल्या जामखेड काँग्रेसकडे दमदार नेतृत्वाची वाणवा आहे. काँग्रेसने जामखेडमध्ये दमदार नेतृत्व उभं न केल्यामुळे जामखेड तालुक्यातील काँग्रेस आता अडगळीला पडली आहे. काँग्रेसचा उरला सुरला पारंपारिक मतदार व कार्यकर्ते नव्या पर्यायकडे वळत आहे. यापूर्वी काँग्रेसमध्ये विखे गट थोरात गट होते. सध्या काँग्रेसचे नेतृत्व थोरात गटाकडे आहे. नवीन आता पदावर आले आहेत. मात्र जून्या नव्यांचा काडीचाही समन्वय दिसत नाही. नवे पक्षवाढीसाठी वेळ न देता इतर पक्षांची स्वार्थी मैत्री जपण्यातच दंग व चमकोगिरी करतांना दिसत आहेत. ये रे माझ्या मागल्या याप्रमाणे काँग्रेसचा कारभार सुरू आहे. पदे अडवून बसणारांची नूसती संख्या मोठी आहे. पक्षवाढीसह जनतेच्या प्रश्‍नांवर आवाज उठवणारांची संख्या अपवादात्मक आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून जामखेडची काँग्रेस कागदावर बलाढ्य अन मैदानात मात्र शुन्य आहे. जनता आता काँग्रेसला आपला आवाज समजत नसल्याचे चित्र आहे. अगामी नगरपरिषद, ग्रामपंचायत निवडणूकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी चमकोगिरी न करता मरगळ झटकून जनहिताच्या प्रश्‍नांवर आवाज उठवण्यासाठी सक्रीय होणे आवश्यक आहे. तरच स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसचा प्रतिनिधी दाखल होऊ शकेल. अन्यथा तालुक्यात काँग्रेसची मरगळ अवस्था सदैव कायम राहिल व कागदावरच बडे नेते कागदावरच बडे राहतील हे मात्र निश्‍चित!


व्यक्तीनिष्ठेमुळे काँग्रेसची वाताहात-

पूर्वी या भागातील काँग्रेसमध्ये विखे गटाचे वर्चस्व होते. निवडणुकांतही विखे गटाचेच वर्चस्व राहिले. पक्षनिष्ठेपेक्षा विशिष्ट गटाशी बांधिलकी ठेऊन विशिष्ट लोकांनीच पदे भोगली. पक्षाचा विस्तार न करता पक्षाच्या जिवावर स्वतः विस्तार वाढवला. आपल्यापेक्षा कोणी मोठे होऊ नये. याची योग्य खबरदारी घेतली. पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तीनिष्ठा जपली गेली. विखे भाजपात गेले की यांचाही आपोआप पक्ष बदलला. सध्या विखे गट भाजपात आहे. किती काळ राहील सांगता येत नाही. मात्र सध्या थोरात गटाला आपला विस्तार करण्याची संधी असतानाही त्या संधीचं सोनं केलं जात नाही. काँग्रेस पक्षाची मागचीच स्थिती आजही कायम आहे. 

जनतेशी नाळ जोडण्यात अपयशी 

जामखेड तालुक्यात काँग्रेस नावालाच असल्याचे चित्र दिसत आहे. आधीच पक्षाला कार्यकर्ते नाहीत. पदाधिकार्‍यांना कार्यकर्त्यांचे व सामान्य माणूसांचे प्रश्‍न समजत नाहीत. नूसती चमकोगिरी चालू आहे. पद मिळाले की मी पणा आला. पदाचा वापर पक्षवाढीसाठी नव्हे आपले साम्राज्य जपण्यासाठी होत आहे. अशी चर्चा आहे. 

Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5550,letest News,584,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,3,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9974,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,660,देश,4147,नाशिक,776,पुणे,590,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15360,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12457,महाराष्ट्र सातारा,26,मुंबई,3442,विदेश,635,संपादकीय,1465,सातारा,3157,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: जामखेडच्या अस्तित्वहीन काँग्रेसला कोण देणार ऊर्जितावस्था ?
जामखेडच्या अस्तित्वहीन काँग्रेसला कोण देणार ऊर्जितावस्था ?
https://new-img.patrika.com/upload/2018/03/19/congress_2531157_835x547-m.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_619.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_619.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content