ओबीसी एनटी व्हीजे एनटी परिषद व आरक्षण बचाव मेळावा संपन्न औरंगाबाद ः ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी एन...
ओबीसी एनटी व्हीजे एनटी परिषद व आरक्षण बचाव मेळावा संपन्न
औरंगाबाद ः ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी एनटी व्हीजे एनटी संघटनांचा पाठींबाच आहे, परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावल्यास परिणामी मंत्रिपदाचा त्याग करुन रस्त्यावर उतरून ओबीसी समाजासाठी लढाई करु असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंञी विजय वडेट्टीवार यांनी केले. ओबीसी एनटी व्हीजे एनटी परिषद मराठवाड्याच्या मेळाव्यात ते बोलत होते.
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे भाजप सरकारने मराठा समाजास नोकरी आणि शिक्षणात इएसबीसी सवलती 13% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. तद्नंतर घटनेप्रमाणे 52 % पेक्षा जास्त आरक्षण देत येत नसल्याने सर्वाच्च न्यायालयात मराठा आरक्षणास स्थगिती देण्यात आली 2019 विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर तीन पक्षांचे मविआ आघाडी सरकार सत्तेत आले सर्वाच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकावे यासाठी मराठा आरक्षण अभ्यास समिती गठीत करुन घटनातज्ञाकडुन मराठा समाज आर्थिक सामाजिक मागासलेला आहे असे अहवाल घटनापीठाकडे सुपूर्द करण्यात आले. मात्र यामुळे ओबीसीच्या आरक्षणाना धक्का लागता कामा नये, असे व वडेट्टीवार यावेळी म्हणाले. यावेळी ओबीसी समाजाचे नेते व जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप आमदार राजेश राठोड कल्याण काळे माजी आमदार प्रकाश शेंडगे नारायण मुंडे बंजारा समाजाच्या नेत्या साधना राठोड ओबीसी संघटनेचे बबनराव तायवाडे चंद्रकांत बावकर जनार्दन तांडेल बालाजी शिंदे अरुण खरमाटे अशोकराव जिवतोडे सचिन राजुरकर मच्छींद्र भोसले बाळासाहेब पांचाळ डॉ बी डी चव्हाण आनंद लहामगे रमेश सानप बाबासाहेब वाघ प्रल्हाद किर्तने विजय राठोड लहु दराडे गणेष किर्तने आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी तर आभार बाबासाहेब वाघ यांनी मानले.
महाराष्टात मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार लोकनेते गोपिनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री असताना एनटी व्हीजे एनटी आरक्षणाचा प्रश्न सोडवला होता आज ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण धोक्यात असेल तर महाराष्टातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी हक्क आरक्षण परीषद मेळावे आयोजित करुन ओबीसी आरक्षणाची लढाई तीव्र केली जाईल.
बाळासाहेब सानप अध्यक्ष जय भगवान महासंघ