$type=ticker$snippet=hide$cate=0

डीटीएच सेवेच्या परवान्यासाठीच्या नव्या मार्गदर्शक सूचना

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत देशात डायरेक्ट टू होम (डीटीएच) सेवा पुरवि...

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत देशात डायरेक्ट टू होम (डीटीएच) सेवा पुरविणा-यांना परवाना घेण्यासाठी निश्‍चित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या दुरूस्तीला मान्यता देण्यात आली.

नव्या नियमानुसार सध्या डीटीएच सेवा पुरविण्यासाठी 10 वर्षांसाठी परवाना दिला जातो, त्याऐवजी आता 20 वर्षांचा परवाना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर संबंधित सेवा पुरवठादारांना त्याचवेळी 10 वर्षासाठी परवान्याचे नूतनीकरण करता येणार आहे. परवाना शुल्क जीआरच्या 10 टक्क्यांऐवजी 8 टक्के करण्यात आले आहे. जीआरमधून जीएसटी कपात केल्यानंतर एजीआरची गणना करण्यात येणार आहे. सध्या परवानाधारकांना वर्षातून एकदा परवाना शुल्क भरावे लागते, त्याऐवजी आता तिमाही भरावे लागणार आहे. डीटीएच ऑपरेटरला परवानगी असलेल्या प्लॅटफॉर्मवरून एकूण वहन क्षमतेच्या जास्तीत जास्त 5 टक्के वाहिन्या चालविण्यास परवानगी असेल. डीटीएच ऑपरेटरकडून प्रत्येक पीएस वाहिनीसाठी एकदाच विना-परतावा 10 हजार रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे. डीटीएच ऑपरेटरांमध्ये पायाभूत सुविधा सामायिक करणे, डीटीएच ऑपरेटर्स आपल्या प्लॅटफॉर्मवरून ऐच्छिक आधारावर टीव्ही वाहिन्यांचे परिवहन प्रवाह सामायिक करण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांना परवानगी देण्यात येईल. टीव्ही वाहिन्यांच्या वितरकांना सबस्क्राइबर मॅनेजमेंट सिस्टिम (एसएमएस) साठी संयुक्त हार्डवेअरवरून सामायिक करण्याची परवानगी असणार आहे. तसेच कंडिशनल अ‍ॅक्सेस सिस्टिम (सीएएस) लागू करता येईल. सध्याच्या डीटीएच मार्गदर्शक सूचनांनुसार परकीय थेट गुंतवणूकीसाठी 49 टक्क्यांची मर्यादा आहे. याविषयी सरकारच्या गुंतवणूक विषयक धोरणानुसार वेळोवेळी सुधारणा करण्यात येणार आहे.

नवीन मार्गदर्शक सूचनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्णयानुसार करण्यात येईल. प्रस्तावित शुल्क कपात ही दूरसंचार क्षेत्राला लागू असलेल्या परवाना शुल्कानुसार करण्यात आली आहे. यातील फरक डीटीएच सेवा प्रदात्यांना अधिक कव्हरेजसाठी गुंतवणूक करण्यास सक्षम करू शकणार आहे. यामुळे जास्त लोकांना सेवा देता येऊन वाढीव आणि नियमित परवानाशुल्क भरता येईल. प्लॅटफॉर्म सेवा नोंदणी शुल्कातून अंदाजे 12 लाखाचे उत्पन्न मिळू शकणार आहे. तसेच डीटीएच ऑपरेटरांनी प्लॅटफॉर्म सामायिक केला तर उपग्रह स्त्रोतांचा अधिक चांगला वापर करता येईल आणि खर्चही विभागला जाईल. परकीय थेट गुंतवणुकीच्या धोरणामुळे या क्षेत्रात देशात अधिक परकीय गुंतवणूक येईल. डीटीएच ऑपरेटिंग सेवा ही अखिल भारतीय स्तरावर आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी आहेत. थेट डीटीएच ऑपरेटर त्याचबरोबर कॉल सेंटर यामध्ये रोजगार मिळतो, अप्रत्यक्षपणे विविध स्तरावर मोठ्या प्रमाणावर लोकांना काम मिळते. आता नवीन सुधारित मार्गदर्शक तत्वांमुळे परवानाधारकांना दीर्घकाळासाठी सेवा पुरविण्याचा परवाना मिळणार आहे. तसेच परकीय थेट गुंतवणूक नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे, परवाना नूतनीकरणामध्ये पुरेशी स्पष्टता आणण्यात आली आहे. त्याचबरोबर डीटीएच क्षेत्रामध्ये गुंतवणूक सुनिश्‍चित केली असून, रोजगाराच्या संधी निर्माण करतानाच या क्षेत्राला स्थैर्य देण्यात आले आहे.






Name

] ब्रेकिंग,860,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5757,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,196,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,37,satara,138,satara.,2,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10309,औरंगाबाद,364,क्रीडा,678,दखल,704,देश,4433,नाशिक,803,पुणे,739,बीड,1437,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16394,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13629,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3696,विदेश,650,संपादकी,1,संपादकीय,1548,सातारा,3200,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: डीटीएच सेवेच्या परवान्यासाठीच्या नव्या मार्गदर्शक सूचना
डीटीएच सेवेच्या परवान्यासाठीच्या नव्या मार्गदर्शक सूचना
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_631.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_631.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content