काबूलः अफगाणिस्तानची राजधानी काबूल साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. रविवारी शहरातील विविध भागात पाच बॉम्बस्फोट झाले. त्यातनऊ नागरिक ठार झाले आहेत...
काबूलः अफगाणिस्तानची राजधानी काबूल साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. रविवारी शहरातील विविध भागात पाच बॉम्बस्फोट झाले. त्यातनऊ नागरिक ठार झाले आहेत. 20 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानचे गृहमंत्री मसूद अंदाराबी यांनी या साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेला दुजोरा दिला आहे.
अफगाणिस्तानात सातत्याने बॉम्बस्फोट घडवून आणले जात आहेत. गेल्या काही आठवड्यात अनेक बॉम्बस्फोट झाले आहेत. शनिवारी अफगानिस्तानच्या परवान प्रांतात अमेरिकेचा एयरबेस असलेल्या बगराम एयरफील्डवर दहशतवाद्यांनी निशाणा साधला होता. दहशतवाद्यांकडून रॉकेटचा मारा करण्यात आला होता; मात्र यामध्ये कोणतेही नुकसान झाले नाही. कलंदर खिलच्या भागात एका ट्रकमधून सकाळी सहा वाजताच्या सुमारास अमेरिकेच्या बगराम एयरफिल्डवर पाच राउंड रॉकेट डागण्यात आली होती. या रॉकेट्सला अफगाणी सुरक्षा रक्षकांनी निकामी केले.
काबूलपासून उत्तरेकडे जवळपास पाचशे किलोमीटर अंतरावर असलेल्या बगराम एयरफिल्ड हे तळ अमेरिकेच्या महत्त्वाच्या एयरबेसपैकी एक आहे. 19 वर्षे अमेरिकन आणि नाटोच्या सैनिकांकडून याचा वापर केला जात आहे. या ठिकाणी झालेल्या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही.