कंगना रनौत सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. कंगना तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे टार्गेट देखील होते आहे. मात्र, असे असताना देखील कंगना प...
कंगना रनौत सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. कंगना तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे टार्गेट देखील होते आहे. मात्र, असे असताना देखील कंगना प्रत्येक विषयावर आपले मत व्यक्त करतेच कंगनाने अलीकडेच शेतकरी आंदोलना विरोधात एक ट्विट केले होते
मुंबई : कंगना रनौत सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. कंगना तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे टार्गेट देखील होते आहे. मात्र, असे असताना देखील कंगना प्रत्येक विषयावर आपले मत व्यक्त करतेच कंगनाने अलीकडेच शेतकरी आंदोलना विरोधात एक ट्विट केले होते. यामुळे तिला बॉलिवूड, पंजाबी आणि भोजपुरी कलाकारांनी टार्गेट केले. आता कंगनाने आजच्या भारत बंद विषयी एक ट्विट केले आहे.
कंगनाने भारत बंद बद्दल एक व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे आणि लिहले आहे की, चला चला भारत बंद करू या, आपल्याकडे वादळांची कमतरता नाही, आणा कुऱ्हाड काही भाग करूयात, प्रत्येक आशा येथे दररोज मरत आहे. देशभक्तांनो आता तुम्हीपण स्वत: साठी देशाचा एखादा तुकडा मागा, या तुम्हीपण रस्त्यावरआणि आंदोलन करा आज हा विषयच संपवू…अशाप्रकारचे ट्विट कंगनाने केले आहे. हे ट्विट करून कंगना अनेकांवर निशाना देखील साधला आहे.
दरम्यान सोशल मीडिया यूजर्सने कंगनाला टार्गेट करण्यास सुरूवात केली होती. सोशल मीडियावर एका यूजर्सने कंगनाचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तो, ‘रंगून’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये गेली होती त्यावेळचा आहे. कॉमेडियन कपिल शर्माने कंगनाला विचारले होते की, “तुम्ही सोशल मीडिया का वापरत नाहीत?” त्यावर कंगना म्हणाली होती की, “मला असे वाटते की सोशल मीडियावर रिकामे लोक जास्त असतात ज्यांना काहीच काम नसते. कारण ज्यांना काम असते त्यांच्याकडे वेळ नसतो सोशल मीडियावर टाईमपास करण्यासाठी ”
हा व्हिडिओ शेअर करताना यूजर्सने कंगनाला आठवण करून दिली होती की, आता तु पण त्याच लोकांच्या वर्गात सामील झाली आहेस. कंगनाच्या टाइमलाइनवर आपण नजर टाकल्यास लक्षात येईल की, कंगनाचे 100 पैकी 90 ट्विट हे कोणाला तरी टार्गेट करणारेच असतात.
पंजाबच्या लुधियाना येथील कॉंग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांचे एक ट्विट जोरदार व्हायरल होत होते. या ट्विटमध्ये खासदार बिट्टू यांनी कंगना रनौतला हिमाचलचे सडलेले सफरचंद म्हटले होते.
या विषयावर बोलताना खासदार बिट्टू म्हणाले होते की, मला कंगनाला हे स्पष्ट सांगायचे आहे की, आमच्या पंजाबी लोकांमध्ये शेकडो समस्या असतील परंतु आम्ही बाहेरील लोकांना आमच्यामध्ये कधीच घुसू देत नाहीत. मला खात्री आहे की त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्याप्रमाणे विरोध केला त्यानंतर हिमाचलमध्ये कंगनाच्या प्रवेशावर बंदी घातली जाईल आणि हिमाचलमधील तरुणांनी कंगनाला धडा शिकवेल यानंतर कंगना लपून बसण्यासाठी फक्त नरेंद्र मोदींच्या घरी जाऊ शकेल.