मुलीकडून तक्रार पोलिसांकडून गुन्हा दाखल नेवासा/प्रतिनिधीः एका विवाहित महिलेकडून भाऊ आणि आईवडील आपल्याला मारहाण करुन छळ करत असल्याची तक्रार...
मुलीकडून तक्रार पोलिसांकडून गुन्हा दाखल
नेवासा/प्रतिनिधीः एका विवाहित महिलेकडून भाऊ आणि आईवडील आपल्याला मारहाण करुन छळ करत असल्याची तक्रार नेवासे तालुक्यातील जळके बुद्रुक येथील मेघा अभिषेक चव्हाण या विवाहित मुलीने अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यानुसार नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करत आईवडील व भावाविरुद्ध 323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहित मुलगी मेघा अभिषेक चव्हाण यांनी म्हटले आहे की, सात महिन्यापूर्वी माझा विवाह अभिषेक कल्याण चव्हाण यांच्याशी झाला. मी सासरी नांदत असतांना दसरा व दिवाळीच्या निमित्ताने मी माहेरच्या लोकांनी मला मारहाण करून मुलगी नांदवायची असल्यास मुलीची किंमत म्हणून एक एकर शेती किंवा हुंडयाच्या रूपाने रक्कम द्यावी अशी मागणी होत असल्याचे स्पष्ट केले आहे. माहेरच्या लोकांच्या त्रासामुळे माझ्या संसाराची राखरांगोळी होत असून माझे लग्न झालेले असतांना माहेरचे लोक दुसरे लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे सांगून माझ्या सासरच्या लोकांविरुद्ध खोटया तक्रारी दाखल करू अशी ही धमकी दिली असल्याचे तक्रारी अर्जात स्पष्ट केले आहे. दिलेल्या तक्रारी वरून नेवासा पोलीसांनी वडील न्यालसिंग कल्याणसिंग भोसले, आई सुमित्रा न्यालसिंग भोसले, भाऊ प्रमोद न्यालसिंग भोसले यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता 323,504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.