$type=ticker$snippet=hide$cate=0

अग्रलेख : रजनीकांतचा चमत्कार?

 अग्रलेख : रजनीकांतचा चमत्कार? तमिळनाडूचे राजकारण द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन पक्षांभोवती फिरते. एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी आणि जयललिता ...

 अग्रलेख : रजनीकांतचा चमत्कार?


तमिळनाडूचे राजकारण द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन पक्षांभोवती फिरते. एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी आणि जयललिता यांच्याभोवती गेली कित्येक दशके तेथील राजकारण फिरत होते. काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांना तिथे फारसे स्थान नाही. चित्रपटातील अभिनेते तिथे नेते होतात. एमजीआर, करुणानिधी आणि जयललिता हे तीन नेतेही चित्रपटातून आले आहेत. त्या तिघांचा काळ आता संपला आहे. अण्णाद्रमुककडे आता वलंयाकित नेतृत्वच नाही. द्रमुकमध्ये भाऊबंदकी वाढली आहे. करुणानिधीचे यांचे चिरंजीव अलगिरी यांनी भाजपत प्रवेश केला आहे. तमिळनाडूतील ही राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी आता सुपरस्टार रजनीकांत पुढे सरसावले आहेत. गेल्या तीन वर्षांपूर्वीच त्यांनी राजकीय पक्षाची आणि स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी बराच काळ मौन धारण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी कौतुक केले. गृहमंत्री अमित शाह यांची त्यांनी भेट घेतली. त्यामुळे त्यांचा राजकीय पक्ष आणि राजकारण दोन्हीही संपले, की काय अशी शंका यायला लागली होती. तीन वर्षांनतर रजनीकांत यांनी मार्चमध्ये पोंगल येथे आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करू, असे जाहीर केले; परंतु मध्यंतरी एका चिठ्ठीने एक वादळ निर्माण झाले. रजनीकांत याक्षणी राजकारणात प्रवेश करणार नाहीत, असा या चिठ्ठीचा सूर होता; मात्र रजनीकांत यांनी ही चिठ्ठी आपली नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यांच्यावर अमेरिकेत झालेली शस्त्रक्रिया आणि त्यांच्या हालचालींना आलेल्या मर्यादा यामुळे राजकारणात ते येतील, की नाही, याबाबत साशंकता होती. त्यातही राजकारण गांभीर्याने करायचे असते, हे रजनीकांत यांच्या गावीही नसावे. अमेरिकेत 2016 मध्ये रजनीकांत यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या डॉक्टरांनीही त्यांना राजकारणात सक्रिय न होण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या राजकीय प्रवेशाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर मला माझ्या जीवनाची पर्वा नाही. मला माझ्या आयुष्याची काळजी नाही. मला लोकांच्या आरोग्याची चिंता आहे. मी राजकीय बदल घडवून आणण्याचे आश्‍वासन दिले. मला राजकारणात सक्रिय राहावे लागेल, असे त्यांनी सांगितले. आता भाजप आणि अण्णाद्रमुकची युती पुढेही चालू राहणार असल्याची घोषणा शाह यांच्या तमिळनाडू दौर्‍यात झाल्यानंतर रजनीकांत यांनी आपल्या पक्षाची घोषणा आणि राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. तमिळनाडूत आणखी चार महिन्यांत निवडणूक होणार असून जानेवारीपासून राजकीय पक्षाचे काम सुरू करणारे रजनीकांत तीन महिन्यांत काय राजकीय चमत्कार घडविणार, याबाबत साशंकता आहे. रजनीकांत म्हणजे असाध्य ते साध्य करणारा असे चित्रपटात घडत असले, तरी प्रत्यक्ष राजकीय जीवनात तसे होत नसते. चित्रपट फॅन्स क्लब राजकीय यश मिळवून द्यायला उपयोगी पडते; परंतु त्यावर केवळ अवलंबून राहता येणार नाही.


चेन्नई सुपरस्टार रजनीकांत यांनी चेन्नईत पत्रकार परिषद घेऊन राजकारणात प्रवेश केल्याबद्दल सांगितले. यामध्ये त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाची घोषणा केली नाही; परंतु त्यांनी राजकारणाची योजना नक्कीच सांगितली. रजनीकांत यांच्या मते, त्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री होण्याचे कधी स्वप्न पाहिले नव्हते आणि त्यांना फक्त राजकारणात बदल हवा होता. आपण एक पक्ष स्थापन करणार असून त्यात सरकार आणि पक्षाचे प्रमुख वेगळे असतील आणि स्वतंत्रपणे काम करतील, असे त्यांनी सांगितले. तमिळनाडूच्या राजकारणाचे दोन मोठे खेळाडू होते, एक जयललिता आणि दुसरे करुणानिधी. लोकांनी दोघांना मतदान केले; परंतु ते गेल्यानंतर राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. आम्हाला बदल घडवून आणण्यासाठी नवीन चळवळ सुरू करावी लागेल, असे त्यांनीच नमूद केले आहे. रजनीकांत यांनी तीन कार्यक्रमात पक्षाचा कार्यक्रमही सांगितला. पक्षातील अशी अनावश्यक पदे आम्ही काढून टाकू. भ्रष्टाचारमुक्त कारभार करू. राजकीय पदांवरील लोकांना त्यांच्या सेवांच्या बदल्यात निविदा आणि कामे दिली जातात. हे थांबवू, असे त्यांनी जाहीर केले. पक्षातील 65 टक्के जागा तरुण, सुशिक्षित आणि चांगल्या प्रतिमेच्या लोकांसाठी असतील. उर्वरित पदे माजी न्यायाधीश, माजी आयएएस अधिकारी आणि यासारख्या लोकांची असतील, ज्यांना समाजसेवेची आवड असेल. रजनीकांत यांच्या घोषणा नक्कीच सामाजिक बदलाचे संकेत देणार्‍या आहेत; परंतु त्याला संघटनात्मक जोड देऊन मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची यंत्रणा जोपर्यंत उभी केली जात नाही, तोपर्यंत यशात रुपांतर होत नाही. बंगळूरमधील एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या शिवाजीराव गायकवाड तमिळनाडू येथे रजनीकांत होण्यासाठी आले. तामिळ सिनेमाच्या सर्वात मोठ्या सुपरस्टारने 2021 च्या विधानसभा निवडणुकीसाठी 31 डिसेंबर रोजी पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली ’मी कधी व कसे येईल याची कोणालाही कल्पना नाही, परंतु जेव्हा मी येईन तेव्हा योग्य वेळी येईल,’ असा त्यांचा संवाद प्रसिद्ध आहे. रजनीकांत म्हणाले, की त्यांच्या राजकारणात प्रवेश करण्याची योग्य वेळ आली आहे. दोन दशकांचा सस्पेन्स संपवून अखेर रजनीकांत यांनी नवीन पक्षाची घोषणा केली. राजकारणात आल्यानंतर मी जिंकलो किंवा हरलो, तरी सर्व काही जनतेचे आहे. मी जिंकलो तर जनतेचा विजय होईल. जर मी हरलो तर पराभवही त्यांचा होईल. तामिळनाडूचे भवितव्य बदलण्याची ही वेळ आहे. रजनीकांत निश्‍चितपणे तामिळनाडूच्या राजकारणावर परिणाम करतील. त्यांचा चाहता वर्ग प्रचंड असून तरूणांमध्येही त्यांना अपील आहे; परंतु त्यांचा पक्ष किती जागांवर विजय मिळवू शकेल हे सांगणे कठीण आहे. निवडणूक भागीदार, सशक्त उमेदवार, वांशिक ध्रुवीकरण अशा अनेक मुद्द्यांवर परिणाम अवलंबून असतील. रजनीकांत यांचा पक्ष अण्णाद्रमुक आणि द्रमुकच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या स्तराच्या नेत्यांना आकर्षित करेल. रजनीकांत यांनी जाहीर केल्याप्रमाणे त्यांचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. तथापि, 2006 च्या निवडणुकीत विजयकांतच्या पक्षासारखाच त्याच्या पक्षालाही नशिबाचा सामना करावा लागू शकतो. 2006 मध्ये विजयकांतच्या पक्षाने सर्व 234 जागा लढवल्या. तथापि, केवळ एका जागेवर यश प्राप्त झाले. तसेच, काँग्रेस, सीपीएम, सीपीआय, वाईकोचे एमडीएमके आणि व्हीसीके सध्या द्रमुकचे भागीदार आहेत आणि डीएमए युती सोडायला आवडणार नाहीत. रजनी फॅन क्लबचे एक कोटीहून अधिक सदस्य म्हणजेच राज्यातील 18 टक्के ते वीस टक्के मतदार आहेत. रजनीकांत यांनी 2018 मध्ये आपला फॅन क्लब आरएमएम लॉन्च केला. ऑनलाइन सुरू झालेल्या या क्लबमध्ये दोन दिवसांत पन्नास हजार चाहत्यांची नोंद झाली. प्रत्येक चाहत्याला वोटरआयडीकडे नोंदणी करावी लागेल. ऑफलाइन नोंदणीसुद्धा सुरू केली गेली. फेब्रुवारी 2018 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्याचे सदस्य 50 लाख होते. सुमारे सहा कोटी लोकसंख्या असलेल्या तमिळनाडूमधील सुमारे 18-20 टक्के मतदार रजनीकांत यांचे नोंदणीकृत चाहते झाले होते. या पार्श्‍वभूमीवर आता रजनीकांत यांनी पुन्हा राजकारणात उडी घेतली आहे. त्यांच्या पक्षाकडे दोन वर्षांपूर्वी नोंदणी झालेले सदस्य कायम राहतील, याची खात्री नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा पक्ष आणि फॅन नोंदणीला अग्रक्रम द्यावा लागेल.  


 


Name

] ब्रेकिंग,862,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,5,Latest News,5780,letest News,599,Loksabha-2019,164,Maharashtra,211,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,156,satara.,4,solapur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,176,अहमदनगर,10382,औरंगाबाद,366,क्रीडा,678,दखल,711,देश,4461,नाशिक,805,पुणे,753,बीड,1438,बुलडाणा,29,बुलढाणा,878,ब्रेकिंग,16554,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13800,महाराष्ट्र सातारा,42,मुंबई,3746,विदेश,655,संपादकी,2,संपादकीय,1562,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अग्रलेख : रजनीकांतचा चमत्कार?
अग्रलेख : रजनीकांतचा चमत्कार?
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_651.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_651.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content