म्हसवड / वार्ताहर : म्हसवड नगरीचे आराध्य दैवत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यात्रेच्या मुख्य दिवशी 15 डिसेंबर रोजी वाहतूक वाहतुकीमध्ये बदल...
म्हसवड / वार्ताहर : म्हसवड नगरीचे आराध्य दैवत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यात्रेच्या मुख्य दिवशी 15 डिसेंबर रोजी वाहतूक वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला असून विरकरवाडी ते म्हसवड रथ ग्रह बायपास ते सरकारी दवाखाना या रोडवर बंदी घालण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली.
म्हसवड नगरीचे आराध्य दैवत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीची यात्रा 15 डिसेंबर रोजी होत असल्याने होत असून या यात्रेनिमित्त सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही भाविक भक्त यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात खाजगी वाहतूक व एसटीने यात्रेसाठी येतात. यात्रेसाठी भाविक मोठ्या प्रमाणात आले तर भाविकांना व पादचारी लोकांना जाणे-येण्यासाठी त्रास होऊ नये. तसेच वाहनांचा अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
दि. 15 रोजी सकाळी आठ वाजले पासून रात्री 10 वाजेपर्यंत विरकरवाडी ते म्हसवड रथगृह-बायपास ते सरकारी दवाखाना या रोडवर बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. याकरिता पर्यायी मार्ग 1 पुणे वरून आटपाडी-म्हसवड हिंगणी राजेवाडी-आटपाडी 2 विरकरवाडी-मेगासिटी-नागोबा मंदिर- कुकुडवाड असा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. या मार्गाने वाहतूक करण्यात येणार आहे. वरील नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.