गेवराई । प्रतिनिधी कांदा चाळीचे बिल अद्यापही मिळाले नसल्याने त्रस्त असलेल्या एका शेतकर्यांने आत्महत्याचे परवानगी प्रशासनाकडे मागितली आहे. या...
गेवराई । प्रतिनिधी
कांदा चाळीचे बिल अद्यापही मिळाले नसल्याने त्रस्त असलेल्या एका शेतकर्यांने आत्महत्याचे परवानगी प्रशासनाकडे मागितली आहे. या बाबतचे निवेदन त्यांनी कृषी विभागाकडे दिलेला आहे. रानमळा येथील नारायण बन्सी मोरे या शेतकर्यांने कांदा चाळ उभारली आहे. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन अर्ज केला होता. मात्र कांदा चाळ उभारुनही त्यांना अद्यापपर्यंत त्याचे अनुदान मिळाले नाही. सदरील शेतकरी आर्थीक संकटात सापडल्याने या शेतकर्याने आत्महत्याची परवानगी कृषी विभागाकडे मागितली आहे.तसे त्यांनी पत्र कृषी विभागाला दिले आहे.