तलवाडा । प्रतिनिधीः- केंद्र सरकार ने शेतीविषयक तीन कायद्याला तसेच विजबिला बाबत जो निर्णय घेतला आहे तो शेतकर्यांच्या हिताचा नाही त्या मुळे स...
तलवाडा । प्रतिनिधीः-
केंद्र सरकार ने शेतीविषयक तीन कायद्याला तसेच विजबिला बाबत जो निर्णय घेतला आहे तो शेतकर्यांच्या हिताचा नाही त्या मुळे सदर कायदा माघे घ्यावा यासाठी मागील आकरा दिवसा पासून दिल्ली या ठिकाणी आंदोलन सुरू आहे.जो पर्यत सरकार कायदा बदलत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार ही भूमिका शेतकरी यांनी घेतली असून शेतकरी व विविध संघटनेच्या आठ डिसेंबर रोजी भारत बंद ची हाक दिली आहे.8 डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंद ला संत रविदास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या वैचारिक अराजकीय सामाजिक युवा संघटने वतीने जाहीर पाठींबा असल्याचे प्रतिष्ठान चे तुळशीराम वाघमारे ,आप्पा सोनटक्के, सुनीताताई नेटके,संध्याताई सोनवणे,शारदाताई वाघमारे,प्रा.पांडव सर,युवराज मोरे,श्रावण खांडेकर,जितेंद्र खरात,बाबू उनवबे,बाळासाहेब राऊत,शेषेराव पोटे,राहुल डोंगरे ,प्रभू उनवबे ,विकास उनवणे,यांच्या सह पदाधिकार्यांनी जाहीर केले आहे.
------------