बॉलिवूड कलाकार सध्या सुट्टया एन्जॉय करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी तापसी पन्नू मालदीवमध्ये तिच्या बहिणी आणि प्रियकरासोबत सुट्टीसाठी गेल...
बॉलिवूड कलाकार सध्या सुट्टया एन्जॉय करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी तापसी पन्नू मालदीवमध्ये तिच्या बहिणी आणि प्रियकरासोबत सुट्टीसाठी गेली होती.
मुंबई : बॉलिवूड कलाकार सध्या सुट्टया एन्जॉय करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी तापसी पन्नू मालदीवमध्ये तिच्या बहिणी आणि प्रियकरासोबत सुट्टीसाठी गेली होती. त्यावेळी तिने बिकिनीवर एक व्हिडिओ तयार केला होता आणि त्या बिकिनीवरील व्हिडिओने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला होता. तापसीचा हा व्हिडिओ बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला खूपच आवडला आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर दीपिकानेही तापसीचे कौतुक केले आहे.
राउंड टेबिल मुलाखतीमध्ये दीपिका म्हणाली की, बिकिनीवर शूट करण्यात आलेल्या व्हिडिओनंतर तापसी पन्नूच्या चाहत्यांची संख्या वाढली आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी पण तापसी पन्नूची खूप मोठी चाहती झाले आहे. तिचा तो व्हिडिओ छान आहे. दीपिकाने कौतुक केल्यानंतर तापसी पन्नू म्हणाली की, दीपिका मी तुझासाठी परत एक असाच एक खास व्हिडिओ बनवेल.
तापसी पन्नूच्या बिकिनी शूट व्हिडिओ शिवाय दीपिकाला अॅमेझॉन प्राइमची वेब सीरियल पाताल लोक आवडली आहे. अनुष्का शर्मा आणि तिचा भाऊ कर्नेश यांनी ही तयार केली आहे. असे वाटते की, दीपिका देखील तापसी पन्नूच्या बिकिनी शूट करण्याचा प्रयत्न करेल. रणवीर सिंगबरोबर ती सुट्टीमध्ये असाच व्हिडिओही बनवू शकते.
आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर एक खळबळ उडवून देणारं ट्वीट केले होते. “अभिनेता सुशांतसिंह राजपूत जर जिवंत असता, तर तोही तुरुंगात असता का?” असा सवाल तापसीने ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने उपस्थित केला होता.
रियाच्या समर्थनात उतरलेल्या बॉलिवूडच्या फळीमध्ये तापसी पन्नूचाही समावेश होता. रियाने ड्रग्ज घेतल्याचा उल्लेख एनसीबीच्या रेकॉर्डवर नसल्याच्या बातमीचे ट्वीट ‘कोट’ करुन तपासीने आपले मत मांडले होते. “करेक्शन. ती सेवन करत नव्हती. सुशांतसाठी फायनान्सिंग करत होती. म्हणजे, जर सुशांत जिवंत असता तर तो तुरुंगात असता? अरे नाही! त्याला ड्रग्ज घेण्यासाठी बळजबरी केली असेल. सुशांतला जबरदस्ती गांजा दिला गेला असेल. होय… हेच आहे. आपण करुन दाखवलं’ असं तापसीने लिहिलं होते. तापसीने ट्वीट केल्यानंतर काही काळ ती ट्विटरवर ट्रेंडमध्ये झाली होती. मात्र सुशांतच्या चाहत्यांना तिचे मत न रुचल्याने ते सोशल मीडियावरुन तिच्यावर तुटून पडले होते.