औरंगाबाद/प्रतिनिधीः राजकीय संन्यास घेण्याचा तडकाफडकी निर्णय घेतल्यानंतर माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नेहमीच राजक...
औरंगाबाद/प्रतिनिधीः राजकीय संन्यास घेण्याचा तडकाफडकी निर्णय घेतल्यानंतर माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नेहमीच राजकीय वादविवाद व वक्तव्यांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेले जाधव या वेळी मात्र त्यांच्या मुलामुळे चर्चेत आले आहे. जाधव यांचा मुलगा आदित्य जाधव याने कन्नड येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली आहे. रावसाहेब दानवे यांच्या कन्या आणि हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांनी ग्रामपंचायतींसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
कन्नड तालुक्यातील अनेक गावांत संजना यांनी पॅनल उतरवण्याची तयारी सुरू केली असतानाच आदित्य याने आईविरोधात हर्षवर्धन जाधव यांचे पॅनल उभे केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव पुन्हा सक्रिय होत असल्याची चिन्ह आहेत. त्याचबरोबर रायभान जाधव यांच्या तिसर्या पिढीने राजकारणात प्रवेश केला आहे. हर्षवर्धन जाधव यांच्यावर ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याच्या आरोप असून त्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या गैरहजेरीत आदित्यने सर्व सूत्र आपल्या हातात घेतली असून या निमित्ताने राजकारणात उडी घेतली आहे. विशेष म्हणजे आदित्य अकरावीत शिकत असतानाच त्योने घेतलेला या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कोतुक होत आहे. पहिल्याच पत्रकार परिषदेत आदित्य याने पत्रकारांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली असून हर्षवर्धन जाधव हे शेतकर्यांसाठी राजकारणात सक्रिय होत असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुका लढवणार असल्याची घोषणाही त्याने पत्रकार परिषदेत केली.