किल्ले धारूर । प्रतिनिधी धारूर शहरात मध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला धारूर शहरातून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एमआयएम भारतीय कम्युन...
किल्ले धारूर । प्रतिनिधी
धारूर शहरात मध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला धारूर शहरातून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एमआयएम भारतीय कम्युनिस्ट पक्ष लालबावटा व शेतकरी संघटना यांनीभारत बंदला प्रतिसाद देत केंद्र सरकारने शेतकर्यांना प्रती केलेल्या जुलमी कायद्याला विरोध करीत आज भारत बंदमध्ये सहभाग घेतला शहरातून सदरील सर्व संघटनांनी हालकी वाजाऊन व्यापार पेठेत फिरून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सर्व व्यापारी वर्गाला केले होते
याला प्रतिसाद देत शहरातील काही व्यापार्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून आंदोलनकर्त्यांना सहकार्य केले येथील शिवाजी चौकात रस्ता रोको नियोजन संघटनांनी केले होते परंतु पोलीस प्रशासनाने याला विरोध केला यामुळे शिवाजी चौकाला छावणीचे स्वरूप आले होते .यावेळी काही प्रमाणात पोलीस प्रशासन व आंदोलक कार्यकर्ते यांच्यामध्ये किरकोळ शाब्दिक चकमक देखील उडाली परंतु सर्वांनी संयम दाखवत त्यानंतर पोलीस प्रशासनास सहकार्य केले बंदमध्ये सहभागी असलेल्या सर्व संघटनांनी पक्षांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार विटेकर यांना दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एम आय एम कम्युनिस्ट पक्ष लालबावटा व शेतकरी संघटना सहभागी झाले होते.