सटाणा:- ( कार्यालय प्रतिनिधी ) शेतकऱ्यांना आठवडाभर दिवसाला बारा तास वीज देण्यात यावी ह्या मागणीसाठी बागलाण तालुक्यातील प्रहार संघटना व शेत...
सटाणा:- ( कार्यालय प्रतिनिधी ) शेतकऱ्यांना आठवडाभर दिवसाला बारा तास वीज देण्यात यावी ह्या मागणीसाठी बागलाण तालुक्यातील प्रहार संघटना व शेतकऱ्यांनी निवेदन देऊनही ही निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज गुरुवार तीन डिसेंबर रोजी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार संघटना व तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोरेनगर सब स्टेशन जवळ आंदोलन केले.
आंदोलन सुरू असतांना तेथील अधिकारी यांनी कुठलीही दखल न घेतल्याने शेतकरी अधिक आक्रमक होऊन शांत मार्गाने सुरू असलेले आंदोलन त्यांनी आक्रमक होत थेट विंचूर प्रकाशा महामार्ग रास्ता रोको केला.
पोलीस प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन अधिकाऱ्यांना येण्यास भाग पाडले रस्त्यावरचे आंदोलन मागे घेऊन विद्युत वितरण कंपनीच्या ऑफिस मध्ये घेऊन अधिकारी व शेतकरी यांच्यात चर्चा करण्यात आली यावेळेस शेतकरी व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक ही झाली.
दिवसाला बारा तास लाईट व प्रत्येक शेतकऱ्याचा एक कोटीचा विमा विद्युत वितरण कंपनीने उतरवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून ही मागणी येत्या आठ दिवसात मान्य नाही झाली तर पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला यावेळी दिला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, सुधाकर पाटील, राजू पाटील, तुषार खैरनार, कपिल सोनवणे, राजु जगताप, दादाजी ह्यालीज, कैलास निकम, दशरथ पुरकर भाऊसाहेब मोरे, महेंद्र खैरनार, राजेंद्र देवरे, कृष्णा जगताप हिंमत माळी, व्यंग चित्रकार किरण मोरे, नाना कुमावत, राजेंद्र मोरे, बाळासाहेब मोरे, शेखर मोरे, भावडु मोरे अजीत खैरणार, योगेश मोरे, हेमंत खैरणार, संजय सारोळकर, बाळासाहेब देवरे, धर्मेंद्र देवरे, महेंद्र मोरे आदी सहभागी झाले होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश गुंजाळ, अजय महाजन, पुंडलिक डंबाळे, अशोक चौरे बंदोबस्त ठेऊन होते.