श्रीगोंदा/तालुका प्रतिनिधी ः श्रीगोंदा पारनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लघुलेखक पदावर कार्यरत असणार्या महिला कर्मचारी शैला राजेंद्र झ...
श्रीगोंदा/तालुका प्रतिनिधी ः श्रीगोंदा पारनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लघुलेखक पदावर कार्यरत असणार्या महिला कर्मचारी शैला राजेंद्र झांबरे यांना गुरुवार दि.17 रोजी अहमदनगर लाचलुचपत विभागाने 3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी येथील एका तक्रारदाराच्या जमिनीचे संदर्भात उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा- पारनेर यांचे समक्ष, चुकीचा फेरफार रद्द करणेबाबत सुरु असलेल्या दाव्याचे निकालपत्राचे आदेशाची प्रत देण्या करिता यातील आरोपी यांनी तक्रारदार यांच्याकडे बुधवारी दहा हजार रुपयांची मागणी करुन, त्याचवेळी 4 हजार रुपयांची लाच देखील स्वीकारली. तसेच उर्वरित रक्कम मिळाल्यानंतर आदेशाची प्रत देईल, असे देखील सांगितले. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांच्याकडे केलेल्या तक्रारीवरुन लाच मागणी पडताळणी मध्ये पंचासमक्ष 5 हजार रुपयांची मागणी करुन, तडजोडीअंती 3 हजार रुपयांची मागणी केली. आरोपी यांनी सदरची रक्कम गुरुवारी श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडले गेले. सदर कारवाई ही अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर, पो. नि. श्याम पावरे यांनी सुनील कडासने, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र, निलेश सोनवणे, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक दिनकर पिंगळे,वाचक पोलीस उपअधीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली.