सातारा / प्रतिनिधी : किसन वीर कारखान्यातील कारभाराची चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करा. संबंधितांच्या मालमत्तेतून कारखान्याचे नुकसा...
सातारा / प्रतिनिधी : किसन वीर कारखान्यातील कारभाराची चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करा. संबंधितांच्या मालमत्तेतून कारखान्याचे नुकसान वसूल करा. कारखाना वाचवा अशी मागणी वाई तालुक्यातील शेतकरी तसेच आ. मकरंद पाटील, नितीन पाटील यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. आ. पाटील यांनी संबंधित तक्रार निवेदनाद्वारे केली आहे. त्यावेळी नितीन पाटील आणि वाई तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. दरम्यान सहकारमंत्री पाटील यांनी तक्रारीची दखल घेऊ असे शेतकर्यांना आश्वासन दिले आहे.