$type=ticker$snippet=hide$cate=0

रयत शिक्षक भरतीचा सावळा गोंधळ

  रयत शिक्षक भरतीचा सावळा गोंधळ गुणवत्ता असूनही डावललेल्या शिक्षकांना न्याय मिळणार का ? अहमदनगर/विशेष प्रतिनिधी ः कर्मवीर भाऊराव पाटील ऊर्फ ...

 


रयत शिक्षक भरतीचा सावळा गोंधळ

गुणवत्ता असूनही डावललेल्या शिक्षकांना न्याय मिळणार का ?

अहमदनगर/विशेष प्रतिनिधी ः कर्मवीर भाऊराव पाटील ऊर्फ अण्णा यांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी काले जिल्हा सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची महुर्तमेढ रोवली. या शिक्षणसंस्थेतून लाखो विद्यार्थ्यांनी स्वालंबी शिक्षणांचे धडे गिरवत समाजात एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले. याच संस्थेमुळे, मराठा, दलित, वंचित समाजासाठी शिक्षणाची गंगा सर्वसामान्यापर्यंत पोहचण्यास मदत झाली. मात्र या रयत संस्थेला भ्रष्टाचाराची कीड पोखरतेय. नुकत्याच झालेल्या शिक्षक भरतीमध्ये गुणवत्ताधारक उमेदवारांना डावलून अमाप पैसा पदाधिकार्‍यांना देणार्‍या उमेदवारांना नोकरी बहाल करण्यात आली. यामुळे संस्थेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाटयावर आला असून, याचसाठी कर्मवीर अण्णांनी अट्टाहास केला होता का, अशी म्हणण्याची वेळ येत आहे. 

आशिया खंडातील नावारुपाला आलेल्या रयत शिक्षण संस्थेचा विस्तार महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात असूनही एकुण 438 शाळा त्यात मुलींच्या 26 तर इंग्रजी माध्यमांच्या 6 आहेत. त्यातील ज्ञानदान करणार्‍या  शिक्षकांची संख्या सुमारे 16 हजार 172 इतकी तर या शाळांमधून ज्ञानार्जन करणारी विद्यार्थी संख्या 4 लक्ष 54 हजार 165 इतकी आहे. एकुण 80 वसतिगृहे त्यातील मुलींसाठी 29 आहे. संस्थेचे विभागीय कार्यालये मध्य विभाग सातारा, दक्षिण विभाग, सांगली, उत्तर विभाग, अहमदनगर, पश्‍चिम विभाग, पुणे, रायगड विभाग, पुणे येथुन त्या त्या विभागाचा कारभार चालतो. रयत दरवर्षी विविध विषयांची पदे भरण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करते. सन 2009-10 या शैक्षणिक वर्षात माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक भरतीसाठी फॉर्मच्या स्वरुपात मध्य विभाग 3,03,330/दक्षिण विभाग-237580/, उत्तर विभाग - 574380/ पश्‍चिम विभाग-220320 रायगड विभाग 96200 असे एकुण 14,31,810 रुपये गोळा केले. मात्र दुर्दैवाने फॉर्म भरणार्‍यांपैकी एकाचीही निवड न करता केवळ लाखो रुपये देणार्‍या उमेदवारांची गुणवत्ता कमी असतानाही त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. सन 2008-09 मध्ये संस्थेने दिलेल्या माहितीनुसार हिंदी विषयाचे 7 पदे रिक्त होती. पदवी परिक्षा गुणवत्ता आणि शासननिर्णयाप्रमाणे ओबीसी प्रवर्गातुन डॉ. योगेश दाणे, कोपरगाव (74.00%) जगताप रुपाली हनुमंत, काळज, फलटण (72.25%) मात्र यांना डावलुन संस्थेच्या भ्रष्ट कारभार्‍यांनी निघोजकर भानुदास सिताराम मलठण शिरुर (69.38%) ठुबे सुनिता चंद्रकांत कान्हुर पठार पारनेर(62.20%)यांची निवड केली. एसटीमधुन घिगे भारत कारभारी शेलद, नगर(70%) गुणवत्ता यादीत असुनही या प्रवर्गाचा एकही उमेदवार घेण्यात आला नाही. ओपनमधुन माळी अतुल बाबासाहेब लाटवडे कोल्हापूर(74.57%)शेख बाबाजान मुसाभाई, शेळगाव पुणे (79.25%) वारुळे योगिता छगन सात्रळ नगर(70.50%) घोलप महेश जगन्नाथ पाथरे, नगर(73.25%)देशमुख सुशीला सुर्यकांत जवळा नगर(72.25%)यांना डावलुन भोसले राजाराम बापुराव खवासपूर सांगोला(64%)मगर सुनिता वसंतराव जेऊर नगर(58.16%)भोसले किरण शंकर भांडेवाडी कर्जत (54%)देशमुख कलावती आबाजी नान्नज संगमनेर(49.50%) पाटील आनंदराव सखाराम पाटणे शाहुवाडी(55%)यांची लाखो रुपये तत्कालीन पदाधिकार्‍यांनी नियुक्ती केलेली आहे. तर सन2009-10 साठी हिंदीची चार पदे रिक्त होती. त्यात गुणवत्तेनुसार माळी अतुल बाबासाहेब लाटवडे(74.57%) मनिषा चव्हाण श्रीगोंदा(74.58%)डॉ.योगेश दाणे कोपरगाव(74%)बाबर वृषाली विलास(73%) बुरुडगावरोड नगर यांचेऐवजी ठाकुर प्रभावती गणेश उरण(61.40%)फटे संजय गणपत घोडेगांव(68.20%)पठाण मुजावर फकीर श्रीगोंदा(67.16%)यांची वर्णी रयतच्या भ्रष्ट प्रशासनाने लावली आहे. अशा स्वरुपाच्या नियुक्ती प्रत्येक विषयात देण्यात आलेल्या असून ही यंत्रणा राबविण्यासाठी काही निवडक मॅनेजिंग सदस्य व सचिव त्यांचे जवळचे संस्थेचे कर्मचारी दलालाची भूमिका निभावत होते.प्रमोशन, बदली यासाठीही राहुरी,श्रीरामपूर तालुक्यातील रयतचे कर्मचारी या कामात चांगलीच अग्रेसर असल्याचे रयत कर्मचारी बोलतात.या कनेक्शनमध्ये सहभागी असलेले चाटुगिरी करणारे शिपाई,क्लार्क यांना प्राचार्यदेखील घाबरत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

        मॅनेजिंग सदस्यांना शिक्षक भरतीचा कोठा दिला जायचा. त्या कोठ्यातुन नगर जिल्ह्यातील एक सदस्य नातेवाईक किंवा त्याच्या खास माणसाकरवी लाखो रुपये घेऊन शिक्षक नियुक्ती करायचा बदल्या करायचा त्याचा शोधही आता मॅनेजमेंटने घ्यावा. या बोगस झालेल्या नियुक्त्या त्यावेळचे सचिव पदांना मान्यता देणार्‍या तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणअधिकारी यांचीही झाडाझडती घेतली तर रामचंद्र जाधवासारखे घबाड यांचेकडेही सापडल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय नियुक्तीतून डावलेल्या गुणवत्ताधारकांना संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी न्याय दिला तरच रयतचे प्रतिमा थोडी उजळ होईल.अन्यथा गेलेली इभ्रत आणि गुणवत्तेचा दावा फोल ठरुन गुणवत्तारहीत शिक्षकांकडून ज्ञानाचे धडे घ्यायचे की नाही याचा विचार पालक वर्ग केल्याशिवाय राहणार नाही. 


बोगस नियुक्ती रद्द करण्याची हिंमत व्यवस्थापन दाखवेल का ?

माजी सचिव प्रा.श्रीरंग झावरे, प्रा.नानासाहेब गायकवाड, प्रा.भाऊसाहेब कराळे, प्रा.अरविंद बुरुंगले यांचे कालखंडात ते आजपर्यंत रयतने नोकरभरतीतील भ्रष्टाचाराचा कळस गाठला ही बाब संस्थेच्या मॅनेजमेंटला माहितच नाही, असे म्हटले तर हास्यास्पद वाटणारे असून, आजवर व्यवस्थापन केवळ झोपेचं सोंग घेत होते .खरचं सचिव पातळीवर गतकाळात नोकरभरती पार पडली असेल तर बोगस नियुक्ती रद्द करण्याची हिंमत व्यवस्थापन दाखवेला का ?


Name

] ब्रेकिंग,858,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,3,Latest News,5731,letest News,597,Loksabha-2019,164,Maharashtra,186,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,29,satara,123,satara.,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,172,अहमदनगर,10274,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,698,देश,4406,नाशिक,801,पुणे,719,बीड,1434,बुलडाणा,21,बुलढाणा,875,ब्रेकिंग,16267,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13484,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3645,विदेश,650,संपादकीय,1536,सातारा,3195,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: रयत शिक्षक भरतीचा सावळा गोंधळ
रयत शिक्षक भरतीचा सावळा गोंधळ
https://i2.wp.com/mazarojgar.com/wp/wp-content/uploads/2020/06/rayat-shikshan-sanstha-bharti-2020-mazarojgar.jpg?resize=471%2C281&ssl=1
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_692.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_692.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content