निघोज प्रतिनिधी : गुणोरे येथील जयसिंग बढे यांनी रूईछत्रपती कडे दुध घेउन जात असताना तेथील हंगा नदीत पाण्यात बुडणार्या तीन युवकांना स्वतःच...
निघोज प्रतिनिधी : गुणोरे येथील जयसिंग बढे यांनी रूईछत्रपती कडे दुध घेउन जात असताना तेथील हंगा नदीत पाण्यात बुडणार्या तीन युवकांना स्वतःच्या जिवाची बाजी लावून जिव वाचवला असून अशाप्रकारे शौर्य दाखवणार्या गुणोरे येथील जयसिंग बढे यांना राज्यसरकारने शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे अशी मागणी शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी केली आहे.
यावेळी बोलताना शेटे यांनी सांगितले की, जयसिंग बढे या गुणोरे गावच्या तरूणाने हंगा नदीत वाहून जाणार्या तीन युवकांचा जिव वाचवला आहे. याची दखल तालुका व जिल्हा प्रशासनातील अधिकार्यांनी घेण्याची आवश्यकता होती. मात्र अद्याप दखल घेतली गेली नाही. हे दुर्दैव म्हणावे लागेल. शिवबा संघटना, प्रल्हाद जनशक्ती तसेच गुणोरे गावच्या वतीने बढे यांचा सत्कार करण्यात आला असून राज्यमंत्री बच्चूभाऊ खंडू तसेच आमदार निलेश लंके यांच्याकडे जयसिंग बढे यांनी केलेले धाडसी शौर्याची माहिती असणारा प्रस्ताव पाठविण्यात येणार असून जयसिंग बढे यांना राज्य सरकारने शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती शेटे यांनी दिली आहे. जयसिंग बढे यांनी स्वतच्या जिवाची पर्वा न करता तीन युवकांचे प्राण वाचवून जे शौर्य दाखवले त्याबद्दल बढे यांचा शिवबा संघटना, प्रहार जनशक्ती पक्षाच्या तसेच निघोज ग्रामस्थांच्यावतीने शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, गुणोरे गावचे माजी सरपंच मनसुख बढे, शिवसेनेचे नेते रमेश वरखडे, सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील वरखडे, रोहिदास लामखडे, विठ्ठलराव लामखडे, लहूशेठ गागरे, रोहन वरखडे, एकनाथ शेटे आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.