नवी दिल्ली : नवीन वर्ष म्हणजे आपणा सर्वांसाठी आशा घेऊन येणारा क्षण. आपल्यामध्ये सकारात्मकता, आशा आणि प्रसन्नता यांचे रोपण करणारा हा दिवस अ...
नवी दिल्ली : नवीन वर्ष म्हणजे आपणा सर्वांसाठी आशा घेऊन येणारा क्षण. आपल्यामध्ये सकारात्मकता, आशा आणि प्रसन्नता यांचे रोपण करणारा हा दिवस असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला त्यांनी देशवासियांच्या नावे शुभेच्छा संदेश जारी केलाय.
यावेळी उपराष्ट्रपती म्हणाले की, नवीन वर्षाचे दुर्दम्य आशावादाने स्वागत करूया. कारण, त्याबरोबरच आपण मागील अशा वर्षाला निरोप देणार आहोत ज्याने आपल्याला आपल्या आठवणीतील सर्वात विघातक अशा महामारीच्या माध्यमातून अनेक जीवनविषयक धडे शिकवले.हिंमत, आत्मविश्वास, एकता आणि लवचिकता यांच्या साथीने आपण आव्हानांवर मात करू, अशी दुर्दम्य आशा जागवूया. गतवर्षाच्या तुलनेत 2021 चा आरंभ अधिक आरोग्यपूर्ण, आनंदी व सुसंवादी पटलावर होत आहे.नवीन वर्षात प्रवेश करताना आपण सर्वांनी या महामारीला हरवण्याचा नव्याने निश्चय आणि आशा करूया. नजीकच्या काळात लवकरात लवकर लस उपलब्ध होईल तेव्हा पुर्ण उत्साहात आणि सकारात्मकतेने 2021 चे स्वागत करूया.वैदिक द्रष्टयांनी 2000 वर्षांपूर्वी केलेल्या प्रार्थनेप्रमाणे आपणही खात्री वाळगूया की आपल्या कानांवर मंगल वृत्त पडावे, चांगल्या गोष्टी नजरेस पडाव्यात आणि येत्या वर्षात आपले आयुष्य सार्थ आणि शांतीपूर्ण रहावे. "भद्रम कर्णेभि: श्रुणुयाम देवा, भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरंगेस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्य देवहितं यदायुः" असा श्लोक नायडू यांनी आपल्या संदेशात नमूद केलाय.