सातपूर : येथील कामगार नगरच्या अशोका वाईन शॉप मध्ये घुसुन व्यवस्थापकाच्या डोक्यात दुकानातील दारुची बाटली फोडली व लाथाबुक्क्याने मारहाण करु...
सातपूर : येथील कामगार नगरच्या अशोका वाईन शॉप मध्ये घुसुन व्यवस्थापकाच्या डोक्यात दुकानातील दारुची बाटली फोडली व लाथाबुक्क्याने मारहाण करुन जखमी केले घटना दि.१० नोव्हेंबर रोजी घडली आहे.तसेच दुकानाच्या गल्ल्यातील पांचशे रुपये बळजबरीने काढून कर्मचारी यांना दांडगाई करुन मारहाण करीत दुकानाचे नुकसान केले.व धमकी दिल्याप्रकरणी व्यवस्थापक मुकेश चौधरी यांच्या फिर्यादीवरुन कृष्णा नागरे यांच्या सह अन्य तीन साथीदारावर सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटना स्थळी सहायक पोलिस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे आदीनी भेट दिली.