बीड । प्रतिनिधी तालुक्यातील बिंदुसरा प्रकल्पाच्या शेजारी एडस बाधितांच्या वंचित मुलाचा सांभाळ करणार्या इंफन्ड इंडियाच्या डोंगराला आज दुपारी ...
बीड । प्रतिनिधी
तालुक्यातील बिंदुसरा प्रकल्पाच्या शेजारी एडस बाधितांच्या वंचित मुलाचा सांभाळ करणार्या इंफन्ड इंडियाच्या डोंगराला आज दुपारी अचानक आग लागल्याने चांगलीच खळबळ उडाली यावेळी येथील अनाथ बालक आणि इतरांनी हि आग मोठ्या शिताफीने विझवली मोठी आहि नसली तरी मोठा अनर्थ टाळला .
पाली येथील डोंगरावर असलेल्या इंफन्ड च्या प्रकल्प शेजारील डोंगराला आज अचानक आग लागली आगीचे कारण समजू शकले नसले तरी या परिसरात अनेक हॉटेल धाबे आहेत आग लागली तेव्हा इन्फनचे संचालक सामाजिक कार्यकर्ते बारगजे कुटूंब तेथेच होते आग उग्र रूप धारण करण्या पूर्वीच येथील बालक आणि काही नागरिकांनी हातात येईल त्या वस्तूने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पाणी आणि झाडाच्या फाड्याच्या आधारे हि आग विझवली या आगीची कल्पना अग्निशमन दलास देण्यात आली आगीत फार काही नुकसान झाले नसले तरी गवत सोबत अनेक झाडे देखील जळाली आहेत हि आग नेमकी कशाने लागली हे मात्र कळू शकले नाही .