$type=ticker$snippet=hide$cate=0

भारत बंदला संमिश्र प्रतिसाद रस्ते, रेल्वे बंद; पोलिसांची बंदोबस्तासाठी तारांबळ

    नवी दिल्ली: शेतकर्‍यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला. विविध राज्यांत अनेक पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते रस्त्...

 

 


नवी दिल्ली: शेतकर्‍यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला. विविध राज्यांत अनेक पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. दिल्लीला जाणारे सर्व रस्ते शेतकर्‍यांनी बंद केले होते. 

भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आज चांदणी चौक आणि सदर बाजार परिसरात गस्त घातली. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून पोलिस खबरदारी घेताना दिसत होते. दिल्लीच्या मोठ्या मार्केटची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली होती. दिल्लीमध्ये जागोजागी पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. 

गुजरातच्या ग्रामीण भागात तीन राज्यमार्ग जाम करण्यात आले होते. या मार्गांवर आंदोलकांनी टायर जाळले. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अमहदाबाद-विरमगाम महामार्ग रोखून धरला, तर काही आंदोलकांनी वडोदरामध्ये साणंदजवळ राजमार्ग रोखला. भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवर गुजरातमध्ये कलम 144 लागू करण्यात आले होते. 

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी आपल्या राळेगणसिद्धी या गावात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. कृषी कायद्याविरोधात सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आणि शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी हजारे उपोषणाला बसले होते. ‘दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळायला हवा. सरकारवर दबाव निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे; मात्र कुठलीही हिंसा होता कामा नये’, असा संदेश हजारे यांनी दिला.

भाजपशासित राज्य असलेल्या गोव्यात भारत बंदचा परिणाम दिसून आला नाही. गोव्यातील सर्व बाजार आणि सार्वजनिक वाहतूक सुरळीत सरू होती. दिल्ली-मिरत  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. गाझीपूर बॉर्डरवर शेतकर्‍यांनी महामार्गाची दुसरी बाजूही बंद केली. त्यामुळे दिल्लीत प्रवेश करता येणारे सर्व रस्ते बंद झाले होते. आसाममध्ये पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.  आंदोलक भारत बंदच्या समर्थनात जनता भवन येथे आंदोलन करीत होते.

कोलकात्याच्या धर्मतला येथे डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. 


आंदोलनाच्या वेळी शेतकर्‍याचा मृत्यू

कृषि विधेयकांना विरोध करण्यासाठी शेतकर्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनातील आणखी एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला. गेल्या 12 दिवसांत आठ शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या शेतकर्‍याला हृदयविकाराचा झटका आला होता. सुरुवातीला काही काळ उपचारांना प्रतिसाद दिला; पण आज सकाळी या व्यक्तीचे उपचारादरम्यान निधन झाले. 


बंदमुळे परीक्षा स्थगित

भारत बंदमुळे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटस् ऑफ इंडियाच्यावतीने घेण्यात येणारी सीए फाऊंडेशन परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. आता 13 डिसेंबर रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. उस्मानिया विद्यापीठानेही आज होणार्‍या परीक्षा स्थगित केल्या आहेत. उद्या होणार्‍या परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसार होणार आहेत. स्थगित करण्यात आलेल्या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ओडिशा लोक सेवा आयोगाची राज्य सेवा मुख्य परीक्षा रद्द करण्यात आली आहे.


पवार, राहुल राष्ट्रपतींना भेटणार

या कायद्याविरोधात उद्या शरद पवार, राहुल गांधी यांच्या सोबत विरोधी पक्षाचे नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. सीपीआय (एम) चे नेते सीताराम येचुरी यांनी ही माहिती दिली. 

हजारे यांचा विरोधकांवर हल्ला

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय फायदा समोर ठेवून विरोधक रस्त्यावर आले आहेत. निवडणुकांवर डोळा ठेवून केली जाणारी विविध राजकीय पक्षांची ही आंदोलने चुकीची आहेत,’ अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे. 

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5577,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,111,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,17,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10049,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,669,देश,4201,नाशिक,779,पुणे,627,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15564,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12675,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3491,विदेश,638,संपादकीय,1479,सातारा,3170,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: भारत बंदला संमिश्र प्रतिसाद रस्ते, रेल्वे बंद; पोलिसांची बंदोबस्तासाठी तारांबळ
भारत बंदला संमिश्र प्रतिसाद रस्ते, रेल्वे बंद; पोलिसांची बंदोबस्तासाठी तारांबळ
https://img.naidunia.com/naidunia/bharat_band_12_09_2018.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_710.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_710.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content