ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया ऍडलेड येथे पहिला कसोटी सामना चालू आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील या एकमेव दिवसरात्र सामन्यात भारतीय संघ च...
ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया ऍडलेड येथे पहिला कसोटी सामना चालू आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील या एकमेव दिवसरात्र सामन्यात भारतीय संघ चांगले प्रदर्शन करताना दिसत आहे. पहिल्या डावात त्यांनी ६६ धावांची आघाडी मिळवली आहे.
यात भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनचा मोठा हात आहे. त्याने पहिल्या डावात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. याच अश्विनने आपल्या गोलंदाजी पद्धतीविषयी वक्तव्य केले आहे. यशस्वी गोलंदाजीचे सूत्र शोधण्यासाठी आपले स्वत:चे तंत्र असल्याचे त्याने सांगितले आहे.
पुढे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अश्विनने आपल्या गोलंदाजीच्या पद्धतीविषयी वक्तव्य केले. तो म्हणाला की,’आपणा सर्वांना माहिती आहे की एकच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे शिकता येऊ शकते. आपण दुसऱ्या व्यक्तीकडून त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीविषयी शिकू शकतो. जेव्हा एखादा फिरकीपटू परदेशात खेळत असतो. तेव्हा आपण किती धावा वाचवल्या आणि किती विकेट घेतल्या, यांचा सखोल अभ्यास करायला पाहिजे. माझे या गोष्टीवर पूर्ण लक्ष असते.’
‘मी सदैव काही ना काही नवे शिकण्याच्या प्रयत्नात असतो. इतर व्यक्ती या गोष्टीला कशाप्रकारे घेतात, ते त्यांच्यावर निर्भर करते. गेल्या दोन वर्षांमधील माझे प्रदर्शन पाहिले, तर परदेशात मी ठीक ठाक गोलंदाजी केली आहे,’ असे शेवटी बोलताना अश्विनने सांगितले.