साखरखेर्डा : प्रतिनिधि साखरखेर्डा ते लव्हाळा रोड वर काल दिनांक 10 डिसेंबर रोजी चार वाजेच्या दरम्यान रस्ता पार करत असताना अज्ञान वाहनाची ध...
साखरखेर्डा : प्रतिनिधि
साखरखेर्डा ते लव्हाळा रोड वर काल दिनांक 10 डिसेंबर रोजी चार वाजेच्या दरम्यान रस्ता पार करत असताना अज्ञान वाहनाची धडक लागून काळवीट जखमी झाले होते . परंतू उपचाराअभावी त्या काळवीटाचा मृत्यू झाला .
११ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजताच्र्या सुमारास काळवीट रस्त्यावर पडलेला पाहून अनेक लोक तेथे जमले होते . काळवीट रस्त्यावर पडलेले पाहून तेथे उपस्थित असलेल्या काही वन्यजीव प्रेमींनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे , वन अधिकारी मेहकर यांना फोन करून सविस्तर माहिती दिली . घटनेची माहिती मिळताच मेहकर वनविभागातील वनसंरक्षक .राजेंद्र शेळके 'वन अधिकारी सोपान राठोड 'बीट जमदार परसराम महाजन तसेच साखरखेडा पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार दिपक राणे हे आपल्या पोलिस कर्मचारी घेऊन घटनास्थळी दाखल झाले . वन कर्मचाऱ्यानी तातडीने वाहनांमध्ये काळविटांना बसून उपचारार्थ साखरखेर्डा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आनले असता तेथे कोणीही आढळले नाही . दवाखाना बंद असल्यामुळे त्यांनी मेहकर येथील दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले . परंतू रस्त्याने जात असताना काळविटाचा मृत्यू झाला . जंगलामध्ये वन विभागातील कर्मचाऱ्यांनी काळवीटा चा दफनविधी केला वेळेवर काळवीटावर उपचार झाले असते तर काळविटाचे प्राण वाचले असते असे तिथे उपस्थित असणाऱ्या वन्यप्रेमींनी आपल्या भावना व्यक्त केल्या