जामखेड प्रतिनिधी ः तालुक्यातील हळगाव जवळा रोडवरील हाँटेल गौरव व श्रीनाथ येथे अवैद्य दारू विक्री होत असल्याची खबर पोलीस निरीक्षक संभाजी गाय...
जामखेड प्रतिनिधी ः तालुक्यातील हळगाव जवळा रोडवरील हाँटेल गौरव व श्रीनाथ येथे अवैद्य दारू विक्री होत असल्याची खबर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोना फुलमाळी, पोकाँ विजय कोळी, पोकाँ संग्राम जाधव, संदिप राऊत, पोकाँ आबासाहेब आवारे, पोकाँ अविनाश ढेरे,अरूण पवार, पोकाँ संदिप आजबे यांच्या पथकाने खर्डा येथे 15 डिसेंबर रोजी दुपारी छाप टाकत केलेल्या कारवाईत हॉटेल भिंतीच्या आडोशाला दारू विक्री करतांना दादा बबन कोळेकर (नान्नज) यांच 6 हजार रुपयांची विदेशी दारू व अमोल दिलिप शिरगिरे (हळगाव) 4848 रूपयांची देशी दारू जप्त करत दोघानाही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच संध्याकाळी शहरातील कान्होपात्रानगरमध्ये एका टपरित बेकायदा सचिन डिगांबर चव्हाण व पंकज तात्याबा नाईकवाडे कल्याण मटका खेळतांना पकडले गेले. 3400 रुपये जुगार मटका साहित्यसह ताब्यात घेतले पोकाँ संदिप राऊत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...तर पोलिस स्टेशनला संपर्क करा
तालुक्यातील कुठेही अवैद्य दारू विक्री वाळु उपसा मटका जुगार चालू आढळून आले तर पोलीस स्टेशनला सरळ संपर्क करा. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल. गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे.