परळी वैजनाथ । प्रतिनिधीः- तालुक्यातील नागापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या काही महिन्यांपासून शाखाधिकारी नसल्याने जून मध्ये दा...
परळी वैजनाथ । प्रतिनिधीः-
तालुक्यातील नागापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या काही महिन्यांपासून शाखाधिकारी नसल्याने जून मध्ये दाखल केलेले पीककर्जाचे प्रस्ताव आणखीनही मंजूर करण्यात आले नाहीत म्हणून या शाखेत लवकरात लवकर शाखाधिकारी यांची नेमणूक करावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
नागापूर येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेत अनेक गावातील शेतकर्यांची खाते आहेत. यामध्ये जुन मध्ये पीककर्जाचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. यातील काही प्रस्ताव मंजूर झाले आहेत. तर आणखी अनेक शेतकर्यांचे पीककर्जाचे प्रस्ताव बँकेत शाखाधिकारी नसल्याने प्रलंबित आहेत. ज्याही वेळी शेतकरी बँकेत विचारण्यासाठी जातात त्यावेळी मँनेजर नाहीत नंतर या म्हणून शेतकर्यांना चकरा माराव्या लागत आहेत. हे प्रस्ताव ज्या पीकांसाठी दिले होते. ते पीक काढून घरी आले तरी पीककर्ज शेतकर्यांना मिळाने नाही. म्हणून नागापूर येथील शेतकर्यांनी बँकेत लवकरात लवकर शाखाधिकारी यांची नेमणूक करावी यासंदर्भातील निवेदन बँकेच्या विभागीय शाखेस देण्यात आले आहे. लवकरात लवकर शाखाधिकारी यांची नेमणूक नाही केल्यास बँके समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे. या निवेदनावर संतोष सोळंके, दिलीप सोळंके, सुंदर सोळंके, अर्जुन सोळंके, सर्जेराव सोळंके, सोमनाथ सोळंके, सुदाम सोळंके, माणिक सोळंके, संभाजी सोळंके, आण्णासाहेब सोळंके सह शेतकर्यांनी स्वाक्षर्या केल्या आहेत.